ATS ची मोठी कारवाई! लखनऊमध्ये ‘अल कायदा’चे दोन दहशतवादी पकडले

मोठ्याप्रमाणावर स्फोटके जप्त; घातपाचा मोठा कट उधळला असल्याची माहिती

ATS arrested Two Al Qaeda terrorists in Lucknow
बॉम्ब शोधक व नाशक पथकास देखील पाचारण करण्यात आले आहे.

लखनऊमध्ये दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकास (एटीएस) मिळाली होती. यानंतर तेथील काकोरी पोलीस ठाणे परिसरातील एक घराला एटीएसने वेढा कारवाई करत दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.

हे दोन्ही दहशतवादी अल कायदा संघटनेचे असल्याची माहिती समोर आली असून, दोघेही पाकिस्तानी हस्तक आहेत. याचबरोबर एटीएसच्या हाती मोठ्याप्रमाणावर स्फोटके देखील लागल्याने, एकप्रकारे घातपातचा मोठा कट उधळला गेल्याचे सांगितले जात आहे.

एटीएस कडून अद्यापही परिसरात शोधमोहीम सुरू आहे. एटीएस सोबत स्थानिक पोलीस देखील या शोध मोहीमेत सहभागी झालेले आहेत. परिसरातील बरचशी घरं देखील रिकामी करण्यात आली असून, बॉम्ब शोधक व नाशक पथकास देखील पाचारण करण्यात आले आहे. तर, अटक करण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरू आहे. सकाळी १० वाजेपासून ही विशेष मोहीम एटीएसने सुरू केलेली आहे, जी अद्यापही सुरू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Big action of ats two al qaeda terrorists arrested in lucknow msr

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या