रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर डिजनी, वॉर्नर ब्रदर्स आणि सोनी पिक्चर्स यासारख्या चित्रपट निर्मात्या कंपन्यांनी रशियामध्ये चित्रपटांचे प्रदर्शन टाळण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी काही मोठ्या चित्रपटांचे प्रदर्शनही याच कारणामुळे थांबवण्यात आले होते. वॉर्नर ब्रदर्सचा बॅटमॅन हा चित्रपट रशियात प्रदर्शित होणार नाही. रॉबर्ट पॅटिन्सनचा हा चित्रपट ३ मार्चला प्रदर्शित होणार होता.

वॉर्नर मीडियाचे प्रवक्ता म्हणाले, “आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवू आणि या शोकांतिकेचे जलद आणि शांततापूर्ण निराकरण होईल अशी आम्हाला आशा आहे.” अमेरिकन मनोरंजन कंपनी डिजनीने एका निवेदनात म्हटले आहे की, “युक्रेनवरील हल्ला आणि मानवतावादी संकटामुळे आम्ही रशियामध्ये चित्रपटांचे प्रदर्शन स्थगित करत आहोत. यामध्ये टर्निंग रेड या आगामी चित्रपटाचाही समावेश आहे. बदलत्या परिस्थितीनुसार आम्ही व्यवसायाशी संबंधित निर्णय घेऊ. या संकटाच्या पार्श्वभूमीवर, आम्ही मदत देण्यासाठी एनजीओ भागीदारांसोबत जवळून काम करत आहोत.”

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इस्रायलवरील हल्ल्यानंतर भारताने जाहीर केली भूमिका; निवेदनात म्हटलं, “दोन्ही देशांतील शत्रूत्वाबद्दल…”
Conflict between Iran and Israel Avoid traveling between both countries India advice to citizens
इराण- इस्रायलमध्ये तणाव: दोन्ही देशांतील प्रवास टाळा; भारताचा नागरिकांना सल्ला
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा

Ukraine-Russia युद्धाच्या पार्श्वभूमीवर गुगलची मोठी कारवाई; रशियाच्या ‘या’ अ‍ॅपवर घातली बंदी

सोनी पिक्चर्सनेही असे म्हटले आहे की ते आगामी चित्रपट मॉर्बियससह रशियामधील चित्रपटांचे प्रदर्शन थांबवत आहे. युक्रेनमधील लष्करी कारवाईची परिस्थिती आणि त्यामुळे निर्माण झालेली अनिश्चितता आणि मानवतावादी संकटामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी रशियापासून अंतर राखण्यास सुरुवात केली आहे. फेसबुक, ट्विटर आणि मायक्रोसॉफ्टने रशियाच्या सरकारशी निगडीत वृत्तसंस्थांद्वारे प्रदान केलेली माहिती मर्यादित केली आहे. यूके पेट्रोलियम कंपन्या बीपी आणि शेलने रशियन कंपन्यांसह त्यांच्या प्रकल्पांमधील भागीदारीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.

Ukraine War: देशासाठी कायपण! युक्रेनची बिअर फॅक्टरी दारू ऐवजी तयार करतेय दारुगोळा

अनेक पाश्चात्य देशांकडून रशियावर निर्बंध लादले जात आहेत. त्यामुळे रशियन कंपन्यांना या देशांमध्ये व्यवसाय करणे कठीण होणार आहे. युक्रेनसोबतचे हे युद्ध असेच सुरू राहिल्यास रशियाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होऊ शकते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही निर्बंध न लावण्याबाबत इशारा दिला आहे. अनेक देशांनी आपली हवाई हद्द रशियन विमानांसाठी बंद केली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून रशियानेही ३० हून अधिक देशांच्या विमानांसाठी आपली हवाई हद्द वापरण्यास बंदी घातली आहे.