बलात्कार प्रकरणात बिहार न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; २४ तासांत निर्णय देत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

जिल्हा न्यायालयाने एकाच दिवशी साक्ष व युक्तिवाद ऐकून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Bihar araria pocso court verdict rape case within 24 hours
(प्रातिनिधीक छायाचित्र)

देशातील अनेक न्यायालयात अनेक महत्त्वाचे असे खटले प्रलंबित आहेत. पण साक्ष, वाद-विवाद आणि निर्णय हे सर्व एकाच दिवसात दिल्याचा प्रकार बिहार न्यायालयात पाहायला मिळाला आहे. बिहारमधील अररिया जिल्हा न्यायालयाने एका दिवसात निकाल देऊन संपूर्ण देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. पोक्सो कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्याची सुनावणी करताना जिल्हा न्यायालयाने त्याच दिवशी साक्ष व युक्तिवाद ऐकून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. पॉक्सो कायद्यासाठी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शशिकांत राय यांनी हा निर्णय दिला आहे.

२३ जुलै रोजी अररियातील नरपतगंज पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपास अधिकारी रिता कुमारी यांनी आरोपीला अटक करून १८ सप्टेंबर रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी न्यायाधीश शशिकांत राय यांच्या न्यायालयाने २० सप्टेंबर रोजी दखल घेतली आणि २४ सप्टेंबर रोजी आरोप निश्चित केले.

त्यानंतर पॉक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश शशिकांत राय यांनी त्याच तारखेला एकूण १० साक्षीदारांची साक्ष ऐकून घेतली आणि त्याच दिवशी आरोपी दिलीप यादव याला दोषी ठरवून जन्मठेप आणि ५० हजार दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान, न्यायालयाने सरकारला पीडितेला सात लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

याआधीही, न्यायाधीश शशिकांत राय यांनी १० वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर झालेल्या हत्येप्रकरणी ऐतिहासिक निकाल दिला होता. या निकालात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. याआधी ४ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दुसऱ्या एका प्रकरणात शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात राहण्याची शिक्षा सुनावली होती. हे दोन्ही ऐतिहासिक निर्णय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-६ पॉक्सो न्यायालयाचे न्यायाधीश शशिकांत राय यांनी सुनावले आहेत.

२२ जुलै रोजी मुलीवर बलात्कार झाला होता आणि दुसऱ्या दिवशी एफआयआर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची तपास अररिया महिला पोलिस स्टेशनच्या प्रभारी रिता कुमारी यांनी केला होता. पत्रकारांशी संवाद साधताना सरकारी वकील श्यामलाल यादव म्हणाले, “अररिया येथील खटला हा देशातील बलात्काराच्या खटल्याचा सर्वात वेगवान खटला होता. या खटल्याने मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील एका न्यायालयाचा विक्रम मोडीत काढला.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bihar araria pocso court verdict rape case within 24 hours abn

ताज्या बातम्या