Bihar Assembly Election 2025 Mahagathbandhan Alliance Candidates Performance : देशाच्या राजकारणातला एक महत्त्वाचा दिवस असं आजच्या दिवसाचं वर्णन करता येईल. कारण बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज आहे. महाआघाडीला बहुमताच्या संख्येपासून निम्म्याहून जास्त फरकांनी मागे ठेवल्याचं दिसून येतं आहे. सध्या जे कल हाती येत आहेत त्यानुसार बिहारमध्ये महाआघाडीला लोकांनी नाकारल्याचं चित्र आहे. एनडीएचं सरकार पुन्हा येईल अशा शक्यता निवडणूक निकालांचे कल दाखवत आहेत. या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून-
Bihar Assembly Election 2025 Mahagathbandhan Performance : विरोधकांच्या महाआघाडीला बिहारच्या जनतेने नाकारल्याचं चित्र, सत्ता पुन्हा एनडीएचीच
नताशा आव्हाड यांचं बिहार निवडणुकीबाबत खोचक ट्वीट
बिहार निवडणुकीचा संबंध महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाशी जोडत नताशा आव्हाड यांनी खोचक ट्वीट केलं आहे. महाराष्ट्र और बिहार तो झाँकी है अभी पश्चिम बंगाल और तामिलनाडू बाकी है वेलडन ग्यानेश कुमार असं म्हणत नताशा आव्हाड यांनी पोस्ट केली आहे.
बिहारचा खेळ इतर राज्यांमध्ये आम्ही होऊ देणार नाही-अखिलेश यादव
बिहारमध्ये जो खेळ SIR ने केला आहे. असा खेळ पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या ठिकाणी चालणार नाही. कारण निवडणुकीच्या आधी कट रचण्यात आला त्या कटाचं पितळ उघडं पडलं आहे. यांना आम्ही हा खेळ खेळू देणार नाही अशी पोस्ट अखिलेश यादव यांनी केली आहे.
बिहार में जो खेल SIR ने किया है वो प. बंगाल, तमिलनाडू, यूपी और बाक़ी जगह पर अब नहीं हो पायेगा क्योंकि इस चुनावी साज़िश का अब भंडाफोड़ हो चुका है। अब आगे हम ये खेल, इनको नहीं खेलने देंगे।CCTV की तरह हमारा ‘PPTV’ मतलब ‘पीडीए प्रहरी’ चौकन्ना रहकर भाजपाई मंसूबों को नाकाम करेगा।…
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) November 14, 2025
बिहारच्या निवडणूक निकालात महाराष्ट्र पॅटर्न, संजय राऊत यांचं खोचक ट्वीट
बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही
निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते! एकदम महाराष्ट्र पॅटर्न! जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवले! अशी पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे.
बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 14, 2025
निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते!
एकदम महाराष्ट्र पॅटर्न!
जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवले!
Tejashwi Yadav Election Result: महागठबंधनच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार तेजस्वी यादवच पिछाडीवर, RJD चे ‘तेज’ ओसरणार?
देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार केलेल्या मतदारसंघातील उमेदवार आघाडीवर
विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार केला होता. ते स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये होते. फडणवीसांनी ज्या ज्या विधानसभांमध्ये प्रचार केल, त्या विधानसभेतील सर्व उमेदवार आघाडीवर आहेत.
सारिका पासवान म्हणाल्या पिक्चर अभी बाकी है
बिहार विधानसभा निवडणुकीतील आतापर्यंतच्या कलांनी एनडीएला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तेजस्वी यादव यांचा राजद बराच मागे आहे. दरम्यान, राजद नेत्या सारिका पासवान यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले. त्या म्हणाल्या, “अशा ६०-७० जागा आहेत जिथे आम्ही १०० ते २०० मतांनी मागे आहोत. त्यामुळे, हे कल निश्चित नाहीत. चित्र अजूनही बाहेर आहे. निकाल बदलतील; आम्हाला अजूनही आशा आहे.”
दिग्विजय सिंह यांचा आरोप; ६२ लाख मतं कापण्यात आली आणि २० लाख मतं जोडण्यात आली
निवडणूक आयोगाच्या निवडणूक निकालानंतर दिग्विजय सिंह म्हणाले, “मला जे संशय होता तेच घडले. ६२ लाख मतं कापण्यात आली आणि २० लाख मते जोडण्यात आली. त्यापैकी पाच लाख मतं एसआयआर फॉर्म न भरता जोडण्यात आली. बहुतेक मते गरीब, दलित आणि अल्पसंख्याकांकडून कापण्यात आली. शिवाय, ईव्हीएमबद्दल शंका कायम आहेत. असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे.
बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांची दोन्ही मुलं पिछाडीवर
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढे येत असून लालू प्रसाद यादवांचे दोन्ही मुले पिछाडीवर आहेत. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा तेजस्वीप्रकाश होते आणि तेच पिछाडीवर बघायला मिळत आहे.
महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव पिछाडीवर
भारतीय निवडणूक आयोगाच्या मते, महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव हे राजदचा बालेकिल्ला असलेल्या राघोपूरमध्ये भाजपचे उमेदवार यांच्या पिछाडीवर आहेत. सकाळी ११.१५ वाजेपर्यंत तेजस्वी यादव यांना 10,957 मतं मिळाली, तर भाजपचे सतीश कुमार यांना 12,230 मतं मिळाली असं चित्र आहे.
बिहारच्या निवडणुकीत एनडीएला २४३ जागा मिळाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही-भाई जगताप
बिहारच्या निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला २४३ च्या २४३ जागा मिळाल्या तरीही मला आश्चर्य वाटणार नाही. कारण मतचोरी करुन हे सगळं केलं जातं आहे. शेकडो मतदार केंद्रांवर गैरप्रकार घडले आहेत असं म्हणत भाई जगताप यांनी भाजपा आणि एनडीएला टोला लगावला आहे.
बिहारमध्ये यावेळी भरघोस असं ६६.९१ टक्के मतदान
बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यातील १२१ मतदारसंघात ६५.८ टक्के मतदान पार पडलं. मागच्यावेळी पहिल्या टप्प्यात ५७.२९ टक्के मतदान झालं. तर, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात २० जिल्ह्यातील १२२ जागांवर ६८.७६ टक्के मतदान झालं. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एकूण ६६.९१ टक्के मतदान झालं.
एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत दाखवण्यात आलं होतं. निवडणूक निकालाचे जे कल हाती येत आहेत त्यामध्ये याहून वेगळं चित्र नाही. विरोधकांच्या महाआघाडीला सध्या तरी जनतेने नाकारलं असल्याचं चित्र दिसून येतं आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (छायाचित्र पीटीआय)
देशाच्या राजकारणातला एक महत्त्वाचा दिवस असं आजच्या दिवसाचं वर्णन करता येईल. कारण बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज आहे. महाआघाडीला बहुमताच्या संख्येपासून निम्म्याहून जास्त फरकांनी मागे ठेवल्याचं दिसून येतं आहे.
