Bihar Election 2025 NDA Alliance Candidates Performance Live Updates : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा ६ नोव्हेंबर रोजी तर दुसरा टप्पा ११ नोव्हेंबर रोजी पार पडला. यानंतर आता आज (१४ नोव्हेंबर) मतमोजणी पार पडणार असून पुढील काही तासांत बिहारच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असून बिहारमध्ये पुन्हा एनडीए सत्ता स्थापन करणार की महाआघाडी? बिहारची जनता कोणाला कौल देणार? एनडीएला किती जागा मिळणार? तसेच महाआघाडीला किती जागा मिळणार? जन सुराज्य पक्षाला किती जागा मिळणार? निकालानंतर बिहारमध्ये कोणाचं सरकार येणार? हे आता पुढील काही तासांत स्पष्ट होणार आहे. पुढील काही तासांत बिहारच्या निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर बिहार निवडणुकीच्या निकालाच्या सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Bihar Assembly Election 2025 Results NDA Performance Live : बिहार निवडणुकीच्या निकालाच्या सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

05:40 (IST) 14 Nov 2025

Bihar Election 2025 Results LIVE : बिहारमध्ये पुन्हा एनडीएची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार?

बिहार विधानसभा निवडणुकीची आता आज (१४ नोव्हेंबर) मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत जर पुन्हा एनडीएची सत्ता आल्यास बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

04:45 (IST) 14 Nov 2025

NDA Bihar Election 2025 Results LIVE : भाजपा-जेडीयू बिहार सरकारची सत्ता कायम राखणार का? काही क्षणात निकाल

NDA Bihar Election 2025 Results LIVE : बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडलं. त्यानंतर आज (१४ नोव्हेंबर) ला मतमोजणी पार पडणार आहे. मात्र, त्याआधी एक्झिट पोल्सनुसार बिहारमध्ये भाजपा-जेडीयूला कौल मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मात्र, खरंच भाजपा-जेडीयू एनडीए सरकारची सत्ता कायम राखणार का? हे पुढच्या काही वेळात स्पष्ट होणार आहे.

03:52 (IST) 14 Nov 2025

NDA Bihar Election 2025 Results LIVE : बिहारमध्ये इंडिया आघाडी की एनडीए? कोण बाजी मारणार?

Bihar Election 2025 Results : बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झाल्यानंतर शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) मतमोजणी होणार असून निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडी की एनडीए कोण बाजी मारणार? हे अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे.

02:49 (IST) 14 Nov 2025

Bihar Election 2025 Results LIVE : चिराग पासवान यांच्या पक्षाच्या किती जागा निवडून येणार?

Bihar Election 2025 Results LIVE : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २९ जागा केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला दिल्या होत्या. त्यामुळे आता चिराग पासवान यांच्या पक्षाच्या किती जागा निवडून येतात? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

01:42 (IST) 14 Nov 2025

Bihar Election 2025 Results LIVE : बिहारमध्ये भाजपाला किती जागा मिळणार? थोड्याच वेळात निकाल

Bihar Election 2025 Results LIVE : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा, जेडयू यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाला बिहारच्या निवडणुकीत किती जागा मिळतात? हे पुढील काही तासात स्पष्ट होणार आहे.

00:43 (IST) 14 Nov 2025

Bihar Election 2025 Results LIVE : मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाला किती जागा मिळणार?

Bihar Election 2025 Results LIVE : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. मात्र, या निवडणुकीत बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाला किती जागा मिळतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

00:42 (IST) 14 Nov 2025

प्रशांत किशोर राजकारण सोडणार? बिहारच्या निवडणूक निकालाआधीच का होतेय चर्चा?

Bihar election 2025 बिहार निकालाचे एक्झिट पोल समोर आल्यानंतर समाज माध्यमांवर अशी चर्चा सुरू केली आहे की, जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर राजकारण सोडण्याची शक्यता आहे. ...वाचा सविस्तर
00:40 (IST) 14 Nov 2025

Bihar Election Results: एक्झिट पोल सांगतात एनडीए जिंकणार, पण तेजस्वी यादव यांचं वेगळं गणित; म्हणाले…

Tejashwi Yadav on Exit Polls : जवळपास सर्वच एक्झिट पोलद्वारे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळेल. तर राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसप्रणित महागठबंधनचा दारुण पराभव होईल. ...वाचा सविस्तर
23:41 (IST) 13 Nov 2025

NDA Bihar Election 2025 Results LIVE : बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार? एक्झिट पोल्समध्ये काय अंदाज वर्तवला होता?

Bihar election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल्सद्वारे बिहारमध्ये एनडीएची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पीपल्स पल्स, पीपल्स इन्साईट, मॅट्रीझ, दैनिक भास्कर, मार्क व जेव्हीसी या कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा नितीश कुमार व भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या बाजूने कौल दिल्याचा अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोल्समध्ये वर्जवण्यात आला आहे.

23:01 (IST) 13 Nov 2025

Bihar Assembly Election Result 2025 : बिहारमध्ये एनडीए सत्ता राखणार की मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा फटका बसणार?

Bihar Assembly Election Result 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज (१४ नोव्हेंबर) पार पडणार असून पुढील काही तासांत बिहारच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत बिहारमध्ये एनडीए पुन्हा सत्ता राखणार की मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा फटका बसणार? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Bihar-Assembly-Election-Result-2025

बिहार विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाइव्ह (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)