Bihar Election 2025 NDA Alliance Candidates Performance Live Updates : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा ६ नोव्हेंबर रोजी तर दुसरा टप्पा ११ नोव्हेंबर रोजी पार पडला. यानंतर आज (१४ नोव्हेंबर) मतमोजणी पार पडत असून थोड्या वेळात बिहारच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असून बिहारमध्ये पुन्हा एनडीए सत्ता स्थापन करणार की महाआघाडी? बिहारची जनता कोणाला कौल देणार? एनडीएला किती जागा मिळणार? तसेच महाआघाडीला किती जागा मिळणार? जन सुराज्य पक्षाला किती जागा मिळणार? बिहारमध्ये कोणाचं सरकार येणार? हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. पुढील बिहारच्या निकालाचं चित्र काही क्षणात स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर बिहार निवडणुकीच्या निकालाच्या सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Bihar Assembly Election 2025 Results NDA Performance Live : बिहार निवडणुकीच्या निकालाच्या सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Bihar Election Result 2025 Live Updates : बिहारमध्ये कोणाचा विजय होणार? धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान; म्हणाले…
बिहार विधानसभा निवडणुकीत कोणाचा विजय होणार? याबाबत बोलताना बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं की “जनतेने ज्याला मतदान केलं आहे, तोच जिंकेल. राष्ट्रवादी विचाराधारा आणि सनातन संस्कृतीला मानणारे विजयी झाले पाहिजेत,” असं धीरेंद्र शास्त्री यांनी एनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं आहे.
#WATCH | Mathura, UP: #BiharAssemblyElections | Bageshwar Dham Sarkar Acharya Dhirendra Krishna Shastri says, "Whoever the public voted for will win. May those with nationalist ideology and Sanatan culture become victorious." pic.twitter.com/C4j3MW98yD
— ANI (@ANI) November 14, 2025
Bihar Election Result 2025 Live Updates : बिहारमध्ये NDA ची १६३ जागांवर एनडीएची आघाडी, मैथिली ठाकूरही आघाडीवर
Bihar Election Result 2025 Live Updates : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा कौल समोर येत आहे. भाजपाकडून गायिका मैथिली ठाकूर हिने दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. आता अलीनगर विधानसभा मतदारसंघातील जनता तिला कौल देतात का? हे पाहणं महत्वाचं असून पुढील काही वेळात निराल जाहीर होईल. सध्या हाती आलेल्या कलानुसार मैथिली ठाकूर आघाडीवर आहे.
Bihar Election Result 2025 Live Updates : बिहामध्ये कोणत्या पक्षाला किती जागांची आघाडी? एनडीए १६० तर महाआघाडी ७८ जागांवर आघाडी
Bihar Election Result 2025 Live Updates : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहेत. सध्या मतमोजणी सुरू आहे. निवडणूक आयोगाने सकाळी ९:५० वाजेपर्यंत १४७ जागांसाठी कल जाहीर केले आहेत. त्यापैकी एनडीए १६० जागांवर आघाडीवर आहे. त्यापैकी भाजपा ४८ जागांवर, जेडीयू ४७ जागांवर, लोक जनशक्ती पार्टी १३ जागांवर आणि एचएएम तीन जागांवर आघाडीवर आहे. आरजेडी फक्त २३ जागांवर आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे.
Bihar Election Result 2025 Live Updates : बांकीपूरमध्ये नितीन नबीन, बेतियामध्ये रेणू देवी आघाडीवर
Bihar Election Result 2025 Live Updates : बिहारचे मंत्री आणि भाजपा नेते नितीन नबीन मतमोजणीच्या १/३१ फेरीत आघाडीवर आहेत. तसेच बेतियामध्ये रेणू देवी आघाडीवर आहेत. पुढील थोड्याच वेळात निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे.
Bihar Election Result 2025 Live Updates: ‘नितीश कुमारच पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार’, खासदार संजय कुमार झा यांचा दावा
बिहारचे मुख्यमंत्री पुन्हा नितीश कुमारच होणार, असा दावा जनता दल युनायटेडचे कार्यकारी अध्यक्ष तथा खासदार संजय कुमार झा यांनी केला आहे. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठा विजय मिळेल, असा विश्वासही त्यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त केला आहे.
#WATCH | #BiharElection2025 | As NDA leads, JD(U) National Working President and MP Sanjay Kumar Jha says, "…The results are in line with our expectations and the feedback we were getting. I think NDA will win with a huge margin…"
— ANI (@ANI) November 14, 2025
He also says, "People (in Mahagathbandhan)… pic.twitter.com/rX0Z4yymFN
Bihar Election Result 2025 Live Updates : बिहारचे उपमुख्यमंत्री यांनी मंदिरात जाऊन प्रार्थना केली
Bihar Election Result 2025 Live Updates : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहेत. सध्या मतमोजणी सुरू आहे. त्याआधी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लखीसराय विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार विजय कुमार सिन्हा यांनी बरहिया येथील जय बाबा गोविंद मंदिर आणि माँ जगदंबा मंदिरात प्रार्थना केली.
#WATCH लखीसराय: बिहार के उपमुख्यमंत्री और लखीसराय विधानसभा सीट से भाजपा उम्मीदवार विजय कुमार सिन्हा ने बड़हिया में जय बाबा गोविंद मंदिर और मां जगदंबा मंदिर में पूजा-अर्चना की। pic.twitter.com/4zZZrYlhbH
— ANI_HindiNews (@AHindinews) November 14, 2025
Bihar Elections 2025 : बिहारच्या निवडणुकीत कोण मारणार बाजी? ‘हे’ ५ मुद्दे ठरवणार सत्ता कोणाची!
Bihar Election Results 2025 : बिहारमध्ये NDA पुन्हा सत्तेत येणार? तब्बल १३५ जागांवर एनडीएची आघाडी, तर महाआघाडीची ७३ जागांवर आघाडी
Bihar Election Results 2025 : बिहारमध्ये NDA पुन्हा सत्तेत येणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. कारण आतापर्यंत हाती आलेला कौल हा NDA ला दिसून येत आहे. सकाळी १० पर्यंत आलेल्या कलानुसार तब्बल १३५ जागांवर एनडीएची आघाडी, तर महाआघाडी ७३ जागांवर आघाडीवर दिसून येत आहे.
“निकाल महाआघाडीच्या बाजूने असतील…”, काँग्रेस नेते अखिलेश प्रसाद सिंह यांना विश्वास
“प्रचारादरम्यान मी जितकं पाहिलं आहे तितकेच बिहारमध्ये बदल होणं आवश्यक आहे. सुरुवातीच्या ट्रेंडवर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. मला विश्वास आहे की निकाल महाआघाडीच्या बाजूने असतील”, असं काँग्रेस नेते अखिलेश प्रसाद सिंह यांनी म्हटलं आहे.
#watch Delhi: Bihar Assembly Elections Results | Congress leader Akhilesh Prasad Singh says, "As much as I have seen during the campaigning, there needs to be a change in Bihar. It is not appropriate to react to the initial trends. I am confident that the results will be in… pic.twitter.com/VUXgIxkgiz
— ANI (@ANI) November 14, 2025
Bihar Vidhan Sabha Election Result : “आमचे निकाल एक्झिट पोलपेक्षा चांगले असतील”, उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांचं विधान
Bihar Vidhan Sabha Election Result : उपमुख्यमंत्री आणि लखीसराय मतदारसंघातील भाजपा उमेदवार विजय कुमार सिन्हा यांनी म्हटलं की, “जे अपेक्षित होते ते आता निकालांमध्ये दिसून येत आहे. बिहारच्या लोकांनी मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर जो विश्वास ठेवला आहे तो देशाला एक नवीन दिशा देईल. अप्पू आणि पप्पूने विचार न करता वेडेपणाचे वातावरण पसरवले, त्यामुळे कोणीही त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेत नाही. आमचे निकाल एक्झिट पोलपेक्षा चांगले असतील.”
#watch | Lakhisarai: Bihar Assembly Election Results | Deputy CM and BJP candidate from the Lakhisarai seat Vijay Kumar Sinha says, "What was anticipated is now turning into results. The trust that the people of Bihar have placed in Modi and Nitish Kumar will give the country a… pic.twitter.com/MhWnt03vnW
— ANI (@ANI) November 14, 2025
Bihar Vidhan Sabha Election Result : “नितीश कुमार मुख्यमंत्री होणार”, मंत्री अशोक चौधरी यांचं मोठं विधान
Bihar Vidhan Sabha Election Result : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहेत. सध्या मतमोजणी सुरू आहे. मात्र, मतमोजणी सुरू असतानाच बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी एक मोठं विधान केलं आहे. “नितीश कुमार मुख्यमंत्री होणार आहेत. नितीश कुमार यांना बाजूला ठेवणारे लोक आता नितीश कुमार काय आहेत हे समजले असेल”, असं मोठं विधान मंत्री अशोक चौधरी यांनी केलं आहे.
#WATCH | Patna: Bihar Assembly Election Results | Bihar Minister Ashok Chaudhary says, "Nitish Kumar is going to become the Chief Minister. The people who used to marginalise Nitish Kumar have now understood what Nitish Kumar is…" pic.twitter.com/Z5sIdM3mGN
— ANI (@ANI) November 14, 2025
Bihar Vidhan Sabha Election Result : पोस्टल मतपत्रिकांमध्येही एनडीए आघाडीवर
Bihar Vidhan Sabha Election Result : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून सध्या हाती आलेल्या माहितीनुसार बिहारमध्ये एनडीएची ८० जागांवर आघाडी, तर महाआघाडी ६० जागांवर आघाडीवर आहे. तसेच मतमोजणी सुरू होताच पोस्टल मतपत्रिकांमध्ये एनडीए महाआघाडीच्या पुढे असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Bihar Election Result 2025 Live : बिहारमध्ये एनडीएची ६६ जागांवर आघाडी, तर महाआघाडी ४४ जागांवर आघाडीवर
Bihar Election Result 2025 Live Updates : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही क्षणात समोर येणार आहे. या निवडणुकीत बिहारची जनता नेमकी कोणाला कौल देते नितीश कुमार की तेजस्वी यादव? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्या हाती आलेल्या माहितीनुसार बिहारमध्ये एनडीएची ६६ जागांवर आघाडी, तर महाआघाडी ४४ जागांवर आघाडीवर आहे.
Bihar Election Result 2025 Live Updates : “हा जनतेचा विजय असेल”: तेजस्वी यादव यांना महाआघाडी सरकार स्थापन करण्याचा विश्वास
Bihar Election Result 2025 Live Updates : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता निवडणुकीचा निकाल अवघ्या काही क्षणात समोर येणार आहे. या निवडणुकीत बिहारची जनता नेमकी कोणाला कौल देते नितीश कुमार की तेजस्वी यादव? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. “हा जनतेचा विजय असेल”, असं म्हणत तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया देत महाआघाडी सरकार स्थापन करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
Bihar Election 2025 Results LIVE : मैथिली ठाकूर आघाडीवर
Bihar Election 2025 Results LIVE : Maithili Thakur : गायिका मैथिली ठाकूरला भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. भाजपाने मैथिली ठाकूरला दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं. तिने जोरदार प्रचारही केला. त्यामुळे आता अलीनगर विधानसभा मतदारसंघातील जनता तिला कौल देतात का? हे पुढील काही तासांत स्पष्ट होणार आहे. सध्या हाती आलेल्या कलानुसार ती आघाडीवर आहे.
Bihar Election Result 2025 Live Updates : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता निवडणुकीचा निकाल अवघ्या काही क्षणात समोर येणार आहे. या निवडणुकीत बिहारची जनता नेमकी कोणाला कौल देते नितीश कुमार की तेजस्वी यादव? हे पुढच्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. राज्यातील 38 जिल्ह्यांमधील सर्व 243 मतदारसंघांमधील उमेदवारांचे भवितव्य आज निश्चित होणार आहे.
Counting of votes for #biharelections2025 begins. The fate of candidates in all 243 constituencies across 38 districts of the state to be decided today.
Counting of votes also begins for Assembly by-elections in 8 constituencies across 6 States and 1 UT. pic.twitter.com/SsDvttfjcl
— ANI (@ANI) November 14, 2025
Nitish Kumar on Bihar Election: “साम-दाम-दंड-भेद कुठल्याही मार्गाने सत्ता मिळवेन”; असं नितीश कुमार पहिल्यांदा कधी म्हणाले होते?
Bihar Election 2025 Result : बिहारमध्ये नितीश कुमार की तेजस्वी यादव? थोड्याच वेळात स्पष्ट होणार
Bihar Election 2025 Results LIVE : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांत लागणार आहे. या निवडणुकीत बिहारची जनता नेमकी कोणाला कौल देते नितीश कुमार की तेजस्वी यादव? हे पुढच्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. कारण ही निवडणूक चुरशीची ठरली होती, त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे.
NDA Bihar Election 2025 Results LIVE : बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी दोन्ही टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यामुळे आता बिहार निवडणुकीत कोणाला यश मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पुढील काही तासात बिहारचा पहिला कौल हाती येणार आहे. त्यामुळे बिहारच्या जनतेला निकालाची उत्सुकता लागलेली आहे.
BJP Bihar Election : हिंदी पट्ट्यात वर्चस्व; तरीही भाजपाला बिहारची हुलकावणी? कारण काय?
Bihar Election 2025 Results LIVE : मैथिली ठाकूर जिंकणार का? काही तासांत निकाल जाहीर होणार
Bihar Election 2025 Results LIVE : Maithili Thakur : गायिका मैथिली ठाकूर हिने काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. त्यानंतर तिला भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. भाजपाने मैथिली ठाकूरला दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं. त्यानंतर तिने जोरदार प्रचारही केला. त्यामुळे आता अलीनगर विधानसभा मतदारसंघातील जनता तिला कौल देतात का? हे पुढील काही तासांत स्पष्ट होणार आहे.
Bihar Election 2025 Results LIVE : बिहारमध्ये पुन्हा एनडीएची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार?
बिहार विधानसभा निवडणुकीची आता आज (१४ नोव्हेंबर) मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत जर पुन्हा एनडीएची सत्ता आल्यास बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
NDA Bihar Election 2025 Results LIVE : भाजपा-जेडीयू बिहार सरकारची सत्ता कायम राखणार का? काही क्षणात निकाल
NDA Bihar Election 2025 Results LIVE : बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडलं. त्यानंतर आज (१४ नोव्हेंबर) ला मतमोजणी पार पडणार आहे. मात्र, त्याआधी एक्झिट पोल्सनुसार बिहारमध्ये भाजपा-जेडीयूला कौल मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मात्र, खरंच भाजपा-जेडीयू एनडीए सरकारची सत्ता कायम राखणार का? हे पुढच्या काही वेळात स्पष्ट होणार आहे.
NDA Bihar Election 2025 Results LIVE : बिहारमध्ये इंडिया आघाडी की एनडीए? कोण बाजी मारणार?
Bihar Election 2025 Results : बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झाल्यानंतर शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) मतमोजणी होणार असून निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडी की एनडीए कोण बाजी मारणार? हे अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे.
Bihar Election 2025 Results LIVE : चिराग पासवान यांच्या पक्षाच्या किती जागा निवडून येणार?
Bihar Election 2025 Results LIVE : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २९ जागा केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला दिल्या होत्या. त्यामुळे आता चिराग पासवान यांच्या पक्षाच्या किती जागा निवडून येतात? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
Bihar Election 2025 Results LIVE : बिहारमध्ये भाजपाला किती जागा मिळणार? थोड्याच वेळात निकाल
Bihar Election 2025 Results LIVE : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा, जेडयू यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाला बिहारच्या निवडणुकीत किती जागा मिळतात? हे पुढील काही तासात स्पष्ट होणार आहे.
Bihar Election 2025 Results LIVE : मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाला किती जागा मिळणार?
Bihar Election 2025 Results LIVE : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. मात्र, या निवडणुकीत बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाला किती जागा मिळतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
प्रशांत किशोर राजकारण सोडणार? बिहारच्या निवडणूक निकालाआधीच का होतेय चर्चा?
Bihar Election Results: एक्झिट पोल सांगतात एनडीए जिंकणार, पण तेजस्वी यादव यांचं वेगळं गणित; म्हणाले…
NDA Bihar Election 2025 Results LIVE : बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार? एक्झिट पोल्समध्ये काय अंदाज वर्तवला होता?
Bihar election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल्सद्वारे बिहारमध्ये एनडीएची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पीपल्स पल्स, पीपल्स इन्साईट, मॅट्रीझ, दैनिक भास्कर, मार्क व जेव्हीसी या कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा नितीश कुमार व भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या बाजूने कौल दिल्याचा अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोल्समध्ये वर्जवण्यात आला आहे.
बिहार विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाइव्ह (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
