Bihar Election 2025 NDA Alliance Candidates Performance Updates : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा ६ नोव्हेंबर रोजी तर दुसरा टप्पा ११ नोव्हेंबर रोजी पार पडला. यानंतर आज (१४ नोव्हेंबर) मतमोजणी पार पडत आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असून बिहारमध्ये पुन्हा एनडीए सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत हाती आलेला कौल हा महायुतीच्या बाजून दिसत आहे. एनडीएला किती जागा मिळणार? तसेच महाआघाडीला किती जागा मिळणार? जन सुराज्य पक्षाला किती जागा मिळणार? बिहारमध्ये कोणाचं सरकार येणार? हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. पुढील बिहारच्या निकालाचं चित्र काही क्षणात स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर बिहार निवडणुकीच्या निकालाच्या सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Bihar Assembly Election 2025 Results NDA Performance Live : बिहार निवडणुकीच्या निकालाच्या सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

23:01 (IST) 13 Nov 2025

Bihar Assembly Election Result 2025 : बिहारमध्ये एनडीए सत्ता राखणार की मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा फटका बसणार?

Bihar Assembly Election Result 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज (१४ नोव्हेंबर) पार पडणार असून पुढील काही तासांत बिहारच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत बिहारमध्ये एनडीए पुन्हा सत्ता राखणार की मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा फटका बसणार? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

बिहार विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाइव्ह (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)