गेल्या काही दिवसांपासून बिहार सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नेमकं कधी होणार? याबाबत मोठ्या चर्चा सुरू होत्या. अखेर आज (७ मे) बिहार सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळात नितीश कुमारांचे सुपुत्र निशांत कुमार यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्यासह आणखी ३२ सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळात आता नितीश कुमार यांचे सुपुत्र निशांत कुमार यांचाही सहभाग असणार आहे. आता त्यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी दिली जाते हे खाते वाटपानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आज झालेल्या बिहार सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी, नितीश कुमार यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.
सम्राट चौधरींच्या मंत्रिमंडळात कोणत्या पक्षाला कसं स्थान मिळालं?
दरम्यान, झालेल्या बिहार सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ३२ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपाचे १५ आमदार, जेडीयूचे १३ आमदार आणि ‘एलजेपी’च्या दोन आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. या बरोबरच ‘एचएएम’ आणि ‘आरएलएसपी’च्या प्रत्येकी एका आमदाराने मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
आज कोणी-कोणी शपथ घेतली?
श्वेता गुप्ता आणि मिथिलेश तिवारी यांच्यासह सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये श्वेता गुप्ता, मिथिलेश तिवारी, रामचंद्र प्रसाद, संजय कुमार सिंह, संजय कुमार आणि दीपक प्रकाश यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
त्यानंतर श्रेयासी सिंह यांच्याबरोबर इतर सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये सुनील कुमार, श्रेयासी सिंह, जामा खान, नंद किशोर राम, शैलेश कुमार उर्फ बुलो मंडल आणि प्रमोद कुमार यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
तसेच रत्नेश सदा यांच्यासह पाच मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. यामध्ये रत्नेश सदा, कुमार शैलेंद्र, शीला कुमारी, केदार प्रसाद गुप्ता, लखेंद्र कुमार रोशन यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
तसेच मदन साहनी यांच्याबरोबर पाच मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. यामध्ये मदन साहनी, भगवान सिंह कुशवाह, अरुण शंकर प्रसाद, संतोष कुमार सुमन आणि रामा निशाद यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
नितीश मिश्रा यांच्याबरोबर पाच मंत्र्यांनी एकत्र शपथ घेतली. त्यामध्ये रामकृपाल यादव, नितीश मिश्रा, दामोदर रावत, संजय सिंह आणि अशोक चौधरी यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

सम्राट चौधरींच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळालं? वाचा!
१) श्वेता गुप्ता
२) मिथिलेश तिवारी
३) रामचंद्र प्रसाद
४) संजय कुमार सिंह
५) संजय कुमार
६) दीपक प्रकाश
७) सुनील कुमार
८) श्रेयसी सिंह
९) जामा खान
१०) नंद किशोर राम
११) शैलेश कुमार
१२) प्रमोद कुमार
१३) रत्नेश सदा
१४) कुमार शैलेंद्र
१५) शीला कुमारी
१६) केदार प्रसाद गुप्ता
१७) कुमार रोशन
१८) मदन साहनी
१९) भगवान सिंह कुशवाह
२०) अरुण शंकर प्रसाद
२१) संतोष कुमार सुमन
२२) रामा निशाद
२३) रामकृपाल यादव
२४) नितीश मिश्रा
२५) दामोदर रावत
२६) संजय सिंह
२७) अशोक चौधरी
२८) श्रवण कुमार
२९) विजय कुमार सिन्हा
३०) लेशी सिंह
३१) निशांत कुमार
निशांत कुमार यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी काय केलं?
निशांत कुमार यांनी काही दिवसांपूर्वीच जेडीयू (JDU) मध्ये अधिकृतपणे प्रवेश केला होता. त्यानंतर आता सम्राट चौधरी यांच्या सरकारमध्ये निशांत कुमार हे कॅबिनेट मंत्री झाले आहेत. दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आधी निशांत कुमार यांनी नितीश कुमार यांच्या पायांना स्पर्श करत आशीर्वाद घेतला.
निशांत कुमार कोण आहेत?
निशांत कुमार यांचा जन्म २० जुलै १९७५ रोजी झाला. ते नितीश कुमार आणि स्वर्गीय मंजू सिन्हा यांचे एकुलते एक चिरंजीव आहेत. ते पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांनी रांची येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (BIT), मेसरा येथून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. अनेक वर्षे राजकारणापासून दूर राहिल्यानंतर आणि आध्यात्मिक मार्गाची आवड व्यक्त केल्यानंतर आता त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. आता ते बिहारच्या मंत्री झाले आहेत.
कोणत्या पक्षाचे किती मंत्री झाले?
भाजपा : विजय कुमार सिन्हा, नितीश मिश्रा, दिलीप कुमार जायसवाल, रामकृपाल यादव, नीतीश मिश्रा, इंजिनिअर कुमार शैलेन्द्र, संजय सिंह टाइगर, रमा निषाद, केदार गुप्ता, लखेंद्र कुमार रोशन, श्रेयसी सिंह, नंदकिशोर यादव, प्रमोद कुमार, मिथिलेश तिवारी, रामचंद्र प्रसाद, अरुण शंकर प्रसाद
जेडीयू : निशांत कुमार, श्रवण कुमार, लेशी सिंग, मदन सहनी, श्वेता गुप्ता, दामोदर रावत, भगवान सिंह कुशवाह, अशोक चौधरी, मदन सहानी, शीला कुमारी, सुनील कुमार, जमा खान, शैलेश कुमार, रत्नेश सदा
इतर : संतोष कुमार सुमन, संजयकुमार सिंह, दीपक प्रकाश
