पीटीआय, पाटणा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्येष्ठ समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. त्यानंतर राजकारण सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे संपूर्ण श्रेय घ्यावे, असा टोला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लगावला आहे.

कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संयुक्त जनता दलाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नितीशकुमार यांनी त्यांच्या पक्षाने याबाबत सातत्याने मागणी केल्याची आठवण करून दिली. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र सरकारचे आभार मानतो. यावेळी त्यांनी घराणेशाहीवर टीका केली. आपण कधीही घराणेशाहीला प्रोत्साहन दिले नाही. त्यामागे कर्पुरी ठाकुर यांची प्रेरणा आहे असे नितीशकुमार यांनी नमूद केले.

हेही वाचा >>>Gyanvapi Mosque : ज्ञानवापी प्रकरणातील ASI च्या अहवालाबाबत वाराणसी न्यायालयाचा मोठा निर्णय

नव्या पिढीसाठी प्रेरणादायी

कर्पुरी ठाकूर यांचे योगदान नव्या पिढीला प्रेरणादायी आहे, असे मत भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष के. लक्ष्मण यांनी व्यक्त केले. हैदराबाद येथे तेलंगण भाजप मुख्यालयात लक्ष्मण यांनी ठाकूर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याचा निर्णय योग्य असल्याचे लक्ष्मण यांनी स्पष्ट केले.

राजकारण नको न्याय गरजेचा

काँग्रेसने या निर्णयाचे स्वागत केले आहे. जातीय जनगणना करणे ही खऱ्या अर्थाने कर्पुरी ठाकूर यांना आदरांजली ठरेल, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. 

मूळ गावी आनंदोत्सव

समस्तीपूर (बिहार): कर्पुरी ठाकूर यांचे मूळ गाव असलेल्या कर्पुरी ग्राम येथे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. समस्तीपूर जिल्ह्यात हे गाव येते. कर्पुरी यांचे ज्येष्ठ पुत्र व संयुक्त जनता दलाचे राज्यसभा सदस्य रामनाथ ठाकूर यांची गावकऱ्यांनी भेट घेतली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar chief minister nitish kumar criticizes pm narendra modi to take full credit for karpuri thakur bharat ratna award amy
First published on: 25-01-2024 at 05:09 IST