बिहारमधील बोधगया येथे तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांचा नियोजित दौरा सुरु आहे. मात्र दलाई लामा यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर बिहार पोलीस एका चिनी महिलेचा शोध घेत आहे. आजच बिहार पोलिसांनी या महिलेचं रेखाचित्र प्रसिद्ध केलं असून ‘अलर्ट’ जारी केला आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) हरप्रीत कौर यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या माहिलेचं रेखाचित्र जारी करण्यात आलं आहे तिचं नाव सोंग शियाओलन असं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासामध्ये या महिलेच्या पासपोर्टबद्दल आणि व्हिजाबद्दलची माहिती हाती लागली आहे. यावरुन पुढील तपास पोलीस करत आहेत.

हरप्रीत कौर यांनी दिलेल्या माहितीनुसार या रेखाचित्राच्या आधारे तपास सुरु आहे. बोधगयामधील हॉटेल व्यवसायातील लोकांकडे पोलीस चौकशी करत आहेत. ही महिला बोधगयाला नेमकी कशासाठी आली असून ती कुठे वास्तव्य करत आहेत याचा आम्ही तपास करत आहोत, असंही हरप्रीत कौर यांनी सांगितलं. ही महिला नेमक्या कोणत्या हेतूने इथं आली आहे याबद्दल आत्ताच भाष्य करणं जरं घाईचं होईल असंही त्या म्हणाल्या. पण अचानक पोलीस या महिलेचा का शोध घेत आहेत हे गूढ उकलेलं नाही. अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार महाबोधि मंदिराजवळच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली असून भक्तांची कसून तपासणी करुनच त्यांना प्रवेश दिला जात आहे.

3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा बोधगयामध्ये एका महिन्याच्या दौऱ्यावर आहेत. दलाई लामा यांच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या नियोजित कार्यक्रमानुसार येथील कालचक्र मैदानावर तीन दिवसीय प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या चिनी महिलेचं रेखाचित्र जारी केल्यानंतर दलाई लामांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

आज दलाई लामांनी एका सभेला संबोधित केलं. “तुम्ही आस्तिक असाल तर तुम्हाला दुसऱ्यांबद्दल विचार केला पाहिजे. आपण सर्वांनी मानवाच्या रुपात जन्म घेतला आहे. मी कुठेही राहिलो तरी मानवतेसाठी काम करत राहीन,” असं दलाई लामा म्हणाले.