बिहारच्या मधुबनी येथील कोर्टाने आपल्या गावात एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला शिक्षा करण्यासाठी उपाय शोधला आहे. त्याला जामीन देताना, मधुबनी न्यायालयाने आदेश दिला आहे की, आरोपीला शिक्षा म्हणून सहा महिने गावातील सर्व महिलांचे कपडे धुवावे लागतील आणि इस्त्री करावी लागेल.

झंझारपूर न्यायालयाचे एडीजे अविनाश कुमार यांनी आरोपी लालन कुमार सफीला जामीन मंजूर केला की तो पीडितेसह सर्व महिलांचे कपडे मोफत धुवेल. २० वर्षीय आरोपीला बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून एप्रिलमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या वकिलांनी त्याच्या केसमध्ये युक्तिवाद केला की तो फक्त २० वर्षांचा आहे आणि त्याला माफ केले पाहिजे. वकिलांनी असेही म्हटले की आरोपी त्याच्या व्यावसायिक क्षमतेने समाजाची सेवा करण्यास तयार आहे. आरोपीचा कपडे धुणे आणि इस्त्री करण्याचा व्यवसाय आहे. न्यायालयाने त्याला मंगळवारी जामीन मंजूर केला.
वॉशिंग आणि इस्त्रीच्या शिक्षेव्यतिरिक्त, न्यायालयाने आरोपीला प्रत्येकी १० हजार रुपये इतकी जामीनाची रक्कम दोनदा भरण्यास सांगितली आहे..

ayesha jhulka, High Court, Pet Dogs Killing, Ayesha Jhulka Moves High Court, Seeking Expedited Justice, ayesha jhulka pet dog killed, ayesha jhulka dog killed case, mumbai high court, mumbai news,
हत्या झालेल्या श्वानाला न्याय मिळवून देण्यासाठी अभिनेत्री आयेशा जुल्का उच्च न्यायालयात
supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
Law College Student Attendance
विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली

दरम्यान, आरोपपत्र दाखल करण्यात आले असून पोलिसांनी त्यांचा तपास पूर्ण केला आहे. दोन्ही बाजूंमध्ये सामोपचारासाठी अर्जही पाठवण्यात आला आहे.
सहा महिन्यांच्या सेवेनंतर आरोपीला गावचे सरपंच किंवा त्याच्या मोफत सेवेचे कोणतेही सरकारी अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र सोपवावे लागेल.
झांझारपूर एडीजे अविनाश कुमार यांच्या कोर्टाने यापूर्वी अशा अनेक विचित्र निकाल सुनावले आहेत. लॉकडाऊन दरम्यान शाळा उघडल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये एका शिक्षकाला गावातील मुलांना मोफत शिकवण्याचे आदेश दिले होते.