बिहारच्या मधुबनी येथील कोर्टाने आपल्या गावात एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला शिक्षा करण्यासाठी उपाय शोधला आहे. त्याला जामीन देताना, मधुबनी न्यायालयाने आदेश दिला आहे की, आरोपीला शिक्षा म्हणून सहा महिने गावातील सर्व महिलांचे कपडे धुवावे लागतील आणि इस्त्री करावी लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झंझारपूर न्यायालयाचे एडीजे अविनाश कुमार यांनी आरोपी लालन कुमार सफीला जामीन मंजूर केला की तो पीडितेसह सर्व महिलांचे कपडे मोफत धुवेल. २० वर्षीय आरोपीला बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून एप्रिलमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या वकिलांनी त्याच्या केसमध्ये युक्तिवाद केला की तो फक्त २० वर्षांचा आहे आणि त्याला माफ केले पाहिजे. वकिलांनी असेही म्हटले की आरोपी त्याच्या व्यावसायिक क्षमतेने समाजाची सेवा करण्यास तयार आहे. आरोपीचा कपडे धुणे आणि इस्त्री करण्याचा व्यवसाय आहे. न्यायालयाने त्याला मंगळवारी जामीन मंजूर केला.
वॉशिंग आणि इस्त्रीच्या शिक्षेव्यतिरिक्त, न्यायालयाने आरोपीला प्रत्येकी १० हजार रुपये इतकी जामीनाची रक्कम दोनदा भरण्यास सांगितली आहे..

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar court orders rape accused to wash clothes of women vsk
First published on: 24-09-2021 at 13:48 IST