Bihar Election 2025 Results Comparison with 2020 : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मोठं यश मिळवलं आहे. भाजपा आणि नितीश कुमार यांच्या जदयूला जवळपास २०० जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेस आणि राजदचा दारूण पराभव झाला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार बिहारमध्ये एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. रात्री नऊ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार एनडीए २०२ जागांवर आघाडीवर आहे. तर, महागठबंधन ३५ जागांवर पुढे आहे.

रात्री नऊ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार भाजपाने सर्वाधिक ८२ जागा जिंकल्या असून त्यांचे उमेदवार सात जागांवर आघाडीवर आहेत. तर, संयुक्त जनता दलाने ७२ जागा जिंकल्या असून १३ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. राष्ट्रीय जनता दलाने २२ जागा जिंकल्या आहेत आणि तीन जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. लोकजनशक्ती पार्टीने (रामविलास पासवान) १७ जागा जिंकल्या आहेत, दोन जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर, काँग्रेसने सहा जागा जिंकल्या आहेत.

२०२० च्या तुलनेत २०२५ चा निकाल

.युती२०२०२०२५
NDAजनता दल (संयुक्त)४३८५
भारतीय जनता पक्ष७४८९
विकासशील इन्सान पार्टी
हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष)
MGBराष्ट्रीय जनता दल७५२५
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस</td>१९
सीपीआय (एमएल) लिबरेशन१२१२
भारतीय कम्युनिस्ट पक्ष
सीपीआय (मार्क्सवादी)