Exit Poll Projections for Bihar Assembly Elections 2025 : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. बिहारच्या जनतेने एनडीएला कौल दिला की महागठबंधनला? की जन सुराज पक्षाला? हे निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र, त्याआधी मतदान पूर्ण झाल्यानंतर संभाव्य निकालाचे एक्झिट पोल समोर आले आहेत. जवळपास सर्वच कंपन्यांच्या व संस्थांच्या एक्झिट पोल्सनुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, विरोधी पक्षांच्या आघाडीला म्हणजेच महागठबंधनला विरोधी बाकावरच बसावं लागेल असं सांगण्यात आलं आहे.

मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत याआधीचे एक्झिट पोल खरे ठरले होते का? कोणत्या कंपनीचे एक्झिट पोल खरे ठरले होते? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबतचे एक्झिट पोल आणि निकालाची आपण उजळणी करणार आहोत.

२०२० च्या निवडणुकीनंतरचे एक्झिट पोल

.संस्थामहागठबंधनएनडीए
अ‍ॅक्सिस माय इंडिया१३५ ते १६१६९ ते ८१
सी-व्होटर१२०११६
चाणक्य१८०५५
जन की बात११८ ते १३८९१ ते ११७
डी. वाय. रीसर्च१०८ ते १२३११० ते ११७

बिहारमध्ये २०२० च्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जाहीर झालेल्या अनेक एक्झिट पोल्समध्ये महागठबंधनची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, राज्यात नितीश कुमार व भाजपाने अधिक जागा जिंकत बिहारमध्ये सत्तास्थापन केली होती.

२०२० च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

एनडीए१२५ जागा
महागठबंधन११० जागा

पक्षनिहाय निकाल (महागठबंधन)

पक्षजागा
राष्ट्रीय जनता दल७५
काँग्रेस१९
डावे१६

पक्षनिहाय निकाल (एनडीए)

पक्षजागा
भारतीय जनता पार्टी७४
जनता दल (संयुक्त)४३
विकासशील इन्सान पार्टी
हिंदुस्तान आवाम मोर्चा