Bihar Elections: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. रॅली, सभा, मेळाव्यांसह नेते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या कामाचा आढावा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. तसेच विविध राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी रणनीती आखत विविध उपक्रम राबवले जात आहेत. काँग्रेसनेही बिहार निवडणुकीसाठी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत महिला मतदारांना आकर्षित करण्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने काही उपक्रम हाती घेतले आहेत. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या एका उपक्रमावरून बिहारच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. काँग्रेसने सॅनिटरी नॅपकिन्स वाटण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र, त्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या पाकिटावर काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा फोटो देण्यात आल्यामुळे प्रचंड वाद सुरू झाला आहे. या संदर्भातील वृ्त्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
नेमकी वाद काय आहे?
काँग्रेसने संपूर्ण बिहारमध्ये पाच लाख सॅनिटरी पॅड वाटण्याची मोहीम हाती घेतली आहे. तसेच वाटण्यात येणाऱ्या सॅनिटरी पॅडवरील बॉक्सवर राहुल गांधींचा फोटोही लावण्यात आलेला आहे. तसेच त्या फोटोवर ‘मै बहन मान योजना’ असं देखील लिहिलेलं आहे. काँग्रेसने ‘पॅडमॅन’ स्टाईल हा उपक्रम सुरू केल्यामुळे आणि सॅनिटरी पॅडवरील बॉक्सवर राहुल गांधींचा फोटो लावण्यात आल्यामुळे भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान, काँग्रेसला विश्वास आहे की महिलांमध्ये सॅनिटरी पॅड वाटल्याने पक्षाची प्रतिमा सुधारेल आणि त्यांना त्यांची मतेही मिळू शकतील. तसेच हा उपक्रम काँग्रेसच्या महिला केंद्रित व्यापक प्रचाराचा एक भाग असल्याचंही बोललं जात आहे. याशिवाय दरमहा २५०० रुपये देण्यात येणार असल्याचंही काँग्रेसकडूनही आश्वासन देण्यात येत आहे. या बरोबरच अशा विविध योजनांवर विचारमंथन करण्यासाठी आज (४ जुलै) बिहार काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक देखील बोलावण्यात आली होती. त्या बैठकीत काँग्रेसचे अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते.
बिहार में हो रही लोकतंत्र की हत्या और मोदी की वोटबंदी के खिलाफ़, तथा पार्टी के अन्य कार्यक्रमों को लेकर आगामी रणनीति पर प्रदेश कांग्रेस अध्यक्ष श्री @rajeshkrinc जी ने प्रेस को संबोधित किया।
? pic.twitter.com/jamMzO5zOLThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Bihar Congress (@INCBihar) July 4, 2025
सॅनिटरी पॅडच्या बॉक्सवर राहुल गांधींचा फोटो, भाजपाची टीका
राहुल गांधींचा फोटो सॅनिटरी पॅडच्या बॉक्सवर लावण्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी जोरदार टीका केली आहे. एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत म्हटलं की, “सॅनिटरी पॅडवर राहुल गांधींचा फोटो लावत काँग्रेस बिहारमधील महिलांचा अपमान करत आहे. काँग्रेस हा महिलाविरोधी पक्ष आहे, बिहारमधील महिला काँग्रेस आणि राजदला निवडणुकीत धडा शिकवतील”, असं प्रदीप भंडारी यांनी म्हटलं आहे.