तुमच्या बँक खात्यात अचानक एका दिवशी कोट्यावधी रुपये जमा झाले तर? बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यासोबत असं घडलं आहे. शेतकरी राम बहादूर शाह यांच्या पेन्शन खात्यात चुकून चक्क ५२ कोटी रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, त्यानंतर या शेतकऱ्याने सरकारकडे एक आवाहन केलं आहे. आपल्या खात्यात चुकीने जमा झालेल्या या ५२ कोटींपैकी काही पैसे मला स्वतःसाठी ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या वृद्ध शेतकऱ्याने केली आहे. किमान उर्वरित आयुष्यात तरी आपल्याला आर्थिक ताणाचा सामना करावा लागू नये म्हणून त्यानी सरकारकडे ही मागणी केल्याचं समजतं.

“आम्हाला यापैकी काही रक्कम द्यावी. जेणेकरून आम्ही आमचं उर्वरित आयुष्य सुरळीतपणे घालवू शकू”, असं आवाहन राम बहादूर शाह यांनी सरकारकडे केल्याचं वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिलं आहे. कटिहार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात राहणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याने आपल्या पेन्शनच्या खात्याची स्थिती विचारण्यासाठी, अपडेट मागण्यासाठी जवळच्या ग्राहक सेवा केंद्राशी (सीएसपी) संपर्क साधला तेव्हा चुकून आपल्या पेन्शन खात्यात करोडो रुपये जमा झाले आहेत हे त्यांना कळलं.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
After Thackeraysena agitation in Kolhapur road works started
ठाकरेसेनेच्या आंदोलनानंतर महापालिकेला जाग; कोल्हापुरात रस्ते कामांना सुरुवात

आम्हाला धक्काच बसला!

राम बहादूर शाह यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “हे ऐकून आम्हाला धक्काच बसला आणि आश्चर्य देखील वाटलं की ही एवढी मोठी रक्कम कुठून आली? आम्ही आमचा संपूर्ण आयुष्य शेतीकामात घालवलं आहे. त्यामुळे, मी फक्त सरकारला इतकंच आवाहन करतो की, आम्हाला यापैकी काही रक्कम द्यावी. जेणेकरून आमचं उर्वरित आयुष्य सुरळीत होईल.

सरकारने आम्हाला मदत करावी!

राम बहादूर शाहचा मुलगा सुजीत कुमार गुप्ता म्हणाला की, माझ्या वडिलांच्या खात्यात ५२ कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. मात्र, “आम्ही रकमेमुळे काहीसे चिंतेत आहोत. आम्ही शेतकरी आहोत आणि गरीब कुटुंबातील आहोत म्हणून सरकारने आम्हाला मदत करावी अशी आमची मागणी आहे”, असं सुजित कुमार गुप्ताने म्हटलं. दरम्यान, कटरा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मनोज पांडेर म्हणाले की, “सध्या आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करतील. राम बहादूर शाह यांचं खातं असलेल्या बँकेच्या अधिकाऱ्याची चौकशी करतील.”