आपलं प्रेम मिळवण्यासाठी कधी कोण काय करेल हे सांगता येत नाही. अनेकजण कुटुंबाचा विरोध झुगारून एकमकेांशी लग्न करतात. तर काही प्रेमी युगुल हे एकत्र येण्यासाठी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतात. बिहारमधील जमुई येथील असाच एक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीने प्रेम करत असलेल्या मुलाशी लग्न करण्यासाठी सर्वांना थक्क करणारा निर्णय घेतलाय. घरामध्ये एकीकडे तिच्या लग्नाची तयारी चालू असताना दुसरीकडे तिने घरातून प्रियकरासोबत पळ काढलाय. विशेष म्हणजे हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर या प्रेमी युगुलांच्या भूमिकेमुळे सगलेच अवाक् झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार बिहारमधील जमुई येथील आहे. येथे एका तरुणीच्या लग्नाची तयारी चालू होती. लग्न अवघ्या काही दिवसांवर आले होते. या तरुणीचे एका तरुणावर प्रेम होते. मात्र तिच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न अन्य ठिकाणी लावून देण्याचं ठरवलं होतं. तशी तयारीदेखील झाली होती. प्रत्यक्ष लग्नापूर्वीच्या वेगवेगळ्या प्रथा-परंपरा आणि विधी पार पाडण्यास सुरुवातही झाली होती. त्याचाच एक भाग म्हणून या तरुणीला हळदही लावण्यात आली होती. मात्र अवघ्या काही दिवसांवर लग्न आलेलं असताना ही तरुणी आपल्या प्रेमीसोबत घरातून पळून गेली.

father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!
Father got angry because of eating junk food girl committed suicide
फास्टफूड, जंकफूड खाल्ल्याने वडील रागावले, संतापाच्या भरात मुलीने…

तरुणीने केलं लग्न

घरात ही तरुणी न दिसल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी आमची मुलगी गायब असल्याची पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतर खरा प्रकार समोर आला. या तरुणीने आपल्या प्रेमीसोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. विशेष म्हणजे हे नवविवाहित दाम्पत्य तरुणाच्या गावात जाऊन राहात होते. त्यांच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात झाली होती. याच गावात पोलीस पोहोचल्यानंतर घरातून पळ काढलेली तरुणी आणि तिचा नवरा एकमेकांना सोडायला तयार नव्हते. आम्ही एकवेळ मरून जाऊ पण एकमेकांना सोडणार नाही, असा पवित्राच या दाम्पत्याने घेतला होता. त्यामुळे नेमकं काय करावं, हे पोलिसांनाही समजत नव्हतं.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या तरुणीच्या जिद्दीकडे पाहून पोलीसही आश्चर्यचकित झाले होते. या घटनेचा व्हिडीओही सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.