Video : “आता ह्यांना निलंबित करुनच मी…”; रस्त्यात अडवलं म्हणून भाजपा मंत्र्याची पोलिसांवर अरेरावी

या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बिहारमधले भाजपाचे मंत्री जिवेश मिश्रा आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांचा कारण म्हणजे त्यांचा एक व्हिडिओ. या व्हिडिओत ते पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या धमक्या देताना दिसत आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी ते जात होते. तेव्हाचा हा व्हिडिओ आहे.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मिश्रा आपल्या गाडीतून चाललेले असताना एका पोलिसाने त्यांना अडवलं. त्यामुळे चिडलेले मिश्रा गाडीतून उतरत माध्यमांकडे वळून म्हणाले, आम्ही सरकार आहोत. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना आधी जाता यावं, म्हणून या पोलिसांनी एका मंत्र्याला अडवलं. त्या दोघांना आधी जाता यावं म्हणून एका मंत्र्यांला त्यांनी थांबवत वाट बघायला लावली, हा कुठला कायदा आहे?, आता, या अधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतरच मी विधानसभेच्या अधिवेशनाला उपस्थित राहीन,”

या आधी मंगळवारी राष्ट्रीय जनता दलाचे नेते भाई वीरेंद्र आणि भाजपा नेते संजय सरावगी या दोघांच्यात विधानसभा परिसरातच बाचाबाची झाली. दोघांनी एकमेकांना शिव्याही दिल्या. एकमेकांविरोधात आक्षेपार्ह टिपण्ण्याही केल्या. मात्र माध्यमांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण निवळलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bihar minister jivesh mishra stopped by cops threatens suspension vsk

Next Story
भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव, कर्नाटकमध्ये सापडले २ रुग्ण!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी