भाजपच्या बैठकीत नेत्यांमध्ये ‘फ्री स्टाईल’

भोजपूर जिल्ह्यातील कायमनगर येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

Loksatta, Loksatta news, loksatta newspaper, marathi news, marathi, Marathi news paper, Marathi news online, Marathi, Samachar, Marathi latest news, national news, national news in marathi, National, Bihar, watch video, Clash, BJP, leaders, party meeting, Bhojpur, bodyguard, arrested
सुरेंद्र सिंह आणि त्यांची पत्नी आशा देवी या दोघांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी हरेंद्र पांडे यांनी केली आहे.

बिहारमध्ये भोजपूर जिल्ह्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दोन नेत्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून एका नेत्याच्या सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटकही केली आहे.

भोजपूर जिल्ह्यातील कायमनगर येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या माजी आमदार आशा सिंह यांचे पती सुरेंद्र सिंह हे देखील पोहोचले. त्यांनी जिल्हाध्यक्ष हरेंद्र पांडे यांना गाठले आणि त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. सुरेंद्र सिंह यांच्या सुरक्षारक्षकाने हरेंद्र पांडे यांना मारहाण केली. शेवटी बैठकीत उपस्थित असलेल्या अन्य पदाधिकाऱ्यांनी धाव घेत सुरक्षारक्षकाला रोखले. घटनेनंतर सुरेंद्र सिंह आणि त्यांचे समर्थक बैठकीतून निघून गेले. जिल्हाध्यक्ष हरेंद्र पांडे यांनी कोलवर पोलीस ठाण्यात सुरेंद्र सिंह आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सुरेंद्र सिंह यांचा सुरक्षारक्षक रिंकू सिंह याला अटक केली आहे. या घटनेनंतर सुरेंद्र सिंह आणि त्यांची पत्नी आशा देवी या दोघांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी हरेंद्र पांडे यांनी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bihar watch video clash between bjp leaders during party meeting in bhojpur bodyguard arrested