छत्तीसगडमधील बिलासपूर विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली आहे. एका विमानाच्या लँडिंगवेळी विमानाचा टायर अचानक फुटल्याची घटना घडली. या विमानाचा टायर फुटल्यानंतर हे विमान धावपट्टीवर काही अंतर तसंच पुढे घसरत गेलं आहे. ही घटना घडली तेव्हा या विमानात ३७ प्रवासी होते. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि विमानातील सर्वजण सुखरुप असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
छत्तीसगडच्या बिलासपूर विमानतळावर शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. लँडिंगच्यादरम्यान अलायन्स एअरच्या एका विमानाचा अचानक टायर फुटला. हे विमान दिल्लीवरून बिलासपूरला जात होतं. यावेळी बिलासपूर विमानतळावर हे विमान उतरत असताना अचानक ही घटना घडली.
टायर फुटल्यानंतर हे विमान धावपट्टीवर काही अंतर तसंच पुढे गेलं. ही घटना घडली तेव्हा या विमानात जवळपास ३७ प्रवासी होते. मात्र, या विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. ही घटना घडल्यानंतर बिलासपूर विमानतळावर एकच खळबळ उडाली होती. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.
Chhattisgarh | A Delhi-Bilaspur Alliance Air flight suffered a tyre burst during landing at Bilaspur airport. There were 37 passengers and 4 crew members onboar; all of them were safely brought out onto the runway and later taken to terminal building.
— ANI (@ANI) August 28, 2026
(Pics: Airport Authority,… pic.twitter.com/I28RygImgA
वृत्तानुसार, ही घटना घडली तेव्हा विमानातील प्रवाशांमध्ये काहीवेळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पण त्यानंतर विमानतळ आणि एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांनी विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून खाली उतरवलं. यात कोणालाही दुखापत झाल्याचं वृत्त नाही. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
समोर आलेल्या माहितीनुसार, अलायन्स एअरलाईनचं हे विमान जेव्हा बिलासपूर विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत होतं, तेव्हा अचानक या विमानाच्या डाव्या बाजूचा टायर फुटला. आता या विमानाची तपासणी सुरू करण्यात आली असून विमानाचाा टायर का फुटला? यामागचं कारण शोधण्यात येणार आहे. तसेच या विमानाच्या तपासणीसाठी हे विमान बिलासपूर विमानतळावर ठेवण्यात आलं आहे. तसेच एअरलाइनने या विमानाची पुढील नियोजित सेवा रद्द केली असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
