जयशंकर यांच्याशी चर्चा फलदायी -ब्लिंकन

जयशंकर हे अमेरिकेत बायडेन प्रशासनाने सूत्रे हाती घेतल्यानंतर तेथे भेट देणारे पहिलेच भारतीय मंत्री आहेत. 

भारत व अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय चर्चा फलदायी झाली असून त्यात भारत-चीन सीमेवरील परिस्थिती, अफगाणिस्तानातील  परिस्थिती या विषयांचा समावेश होता, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे.  कोविड १९ मदतीवरही चर्चा झाली असून दोन्ही देशांनी सामायिक मुद्द्यांवर सहकार्य करण्याचे ठरवले आहे.

जयशंकर हे अमेरिकेत बायडेन प्रशासनाने सूत्रे हाती घेतल्यानंतर तेथे भेट देणारे पहिलेच भारतीय मंत्री आहेत.  भारत व अमेरिका यांच्यातील जागतिक भागीदारी पुढे नेण्याच्या प्रश्नावर त्यांनी भर दिला असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी म्हटले आहे.

जयशंकर यांनी सांगितले की, भारत व अमेरिका लस सहकार्यावरही चर्चा झाली असून लशीचा पुरेसा साठा मिळणार आहे. अमेरिकेने या काळात भारताच्या पाठीशी राहून मदत केल्याबाबत आम्ही आभार मानतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bilateral talks between india and the united states akp

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या