Bilkis Bano case: सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानो प्रकरणातील ११ दोषींची सुटका केल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असून राजकीय नेतेही यावर भाष्य करत आहेत. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीदेखील दोषींची सुटका केल्याने संताप व्यक्त केला असून, भाजपाला लक्ष्य केलं आहे. गुजरात असो अथवा कठुआ, भाजपा नेहमीच बलात्काऱ्यांच्या पाठीशी उभी राहते असा आरोप ओवेसींनी केला आहे. ओवेसी यांनी ट्वीट केलं असून नशीब नथुराम गोडसेला तरी फासावर लटकवलं अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

भाजपाच्या आमदाराने बिल्किस बानो प्रकरणातील दोषी ब्राह्मण असून त्यांच्यावर चांगले संस्कार असल्याचं विधान केलं आहे. त्यावर व्यक्त होताना ओवेसी म्हणाले की, “भयंकर गुन्हा केल्यानंतरही काही लोकांची जात त्यांना कारागृहात जाण्यापासून वाचवत असताना, काही लोकांचा धर्म आणि जात पुरावा नसतानाही त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी पुरेसं आहे”.

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
Girish Mahajan criticizes Eknath Khadse in jalgaon
“माझ्यामुळे भाजप आहे, म्हणणारे आता थप्पीला” गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे लक्ष्य
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

Bilkis Bano case: “दोषींची सुटका रद्द करा, हे फार लाजिरवाणं”, तब्बल सहा हजारजणांची सुप्रीम कोर्टाकडे मागणी

“बिल्किस बानो प्रकरणातील दोषी ब्राह्मण, त्यांच्यावर चांगले संस्कार आहेत”; भाजपा आमदाराचं व्यक्तव्य

ओवेसी यांनी दोषींची सुटका रद्द करावी अशी मागणी केली आहे. “गोडसेला दोषी ठरवून फाशी दिली यासाठी आपण देवाचे आभार मानले पाहिजेत,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे.

‘न्यायव्यवस्थेवरील माझी श्रद्धा दोषींच्या मुक्ततेमुळे डळमळीत!’; अत्याचार करणाऱ्यांची सुटका झाल्याने मन सुन्न : बिल्किस बानो

१५ ऑगस्टला केलेल्या भाषणात एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला सक्षमीकरणावर जोर देत असताना दुसरीकडे बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची गुजरात सरकारकडून सुटका करण्यात आली. यासंबंधी बोलताना ते म्हणाले “सीबीआय तपासानंतर दोषी ठरलेले असताना गुजरात सरकारने त्यांची सुटका करताना केंद्राची परवानगी घेतली होती का?” अशी विचारणा त्यांनी केली असून भाजपाचं लक्ष्य गुजरात निवडणुकीवर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

“बिल्किस बानो प्रकरणातील दोषी ब्राह्मण, त्यांच्यावर चांगले संस्कार आहेत”

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची सुटका केल्यानंतर भाजपाचे विद्यमान आमदार सीके राऊलजी यांनी या निर्णयाचं समर्थन केले आहे. १५ वर्षांच्या शिक्षेनंतर मुक्त करण्यात आलेले ११ जण ब्राम्हण असून त्यांच्यावर चांगले संस्कार असतात, असं ते म्हणाले.

गुजरात सरकारच्या ज्या समितीने दोषींच्या सुटकेचा निर्णय घेतला आहे, त्यामध्ये सीके राऊलजी होते. यासंदर्भात बोलताना एका मुलाखतीत ते म्हणाले, ”या प्रकरणातील ११ दोषी हे ब्राह्मण होते आणि ब्राह्मणांवर चांगले संस्कार असतात. कदाचित त्यांना या प्रकरणात अडकवण्यात आलं असावं, तसंच तुरुंगात असताना त्यांचे वर्तन चांगले होते”, असंही ते म्हणाले.

नेमकं काय झालं आहे –

गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यास आग लावून झालेल्या हिंसाचारानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या भीषण दंगलीत दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यातील रणधिक्पूर गावात बिल्किस यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. या वेळी त्या पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. तसेच त्यांच्या अवघ्या तीन वर्षांच्या मुलीसह सात जण कुटुंबीयांची हत्या करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गुजरात सरकारचा निर्णय १९९२ च्या माफी धोरणानुसार या दोषींच्या याचिकेवर विचार करावा, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गुजरात सरकारने या ११ दोषींना मुक्त करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने या ११ आरोपींना २१ जानेवारी २००८ रोजी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्यांची ही शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. या दोषींनी १५ वर्षांपेक्षा जास्त काळ कैदेत व्यतीत केल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने सर्वोच्च न्यायालयात शिक्षेत सवलतीची याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गुजरात सरकारने या प्रकरणी एक समिती स्थापन केली. या समितीच्या निर्णयानुसार या ११ जणांच्या मुक्ततेचा निर्णय झाला होता.

बिल्किस बानो यांनी व्यक्त केल्या भावना –

“या निर्णयावर तातडीने प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी मला शब्दच सुचत नव्हते. मी अजूनही सुन्नच आहे. या स्थितीत कोणाही महिलेला न्याय कसा मिळेल? माझा आपल्या देशातील सर्वोच्च न्यायव्यवस्थेवर विश्वास होता. हा धक्का पचवून, मी पूर्ववत जगू लागले होते. परंतु या दोषींच्या सुटकेने माझी अवघी शांतता हिरावली आणि आता माझा न्यायावरील विश्वास डळमळीत झाला आहे. माझे दु:ख आणि डळमळलेला विश्वास माझ्यापुरता नसून न्यायालयांत न्यायासाठी झगडणाऱ्या प्रत्येक महिलेला अशाने न्याय मिळेल का, याबद्दल शंका निर्माण झाली आहे. त्यांच्याबद्दल मला दु:ख वाटते. या दोषींच्या मुक्ततेनंतर गुजरात सरकारने माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची हमी द्यावी,” अशी प्रतिक्रिया बिल्किस बानो यांनी म्हटलं आहे.