ट्रथ ऑर कॉन्सेक्वेन्सेस (अमेरिका)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन हे स्वत:च्या अंतराळयानात (विंग्ड रॉकेट शिप) अंतराळात पोहचले आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या या सर्वात धाडसी मोहिमेत भारतीय वंशाची सिरिषा बांदला ही त्यांच्या सहकाऱ्यांपैकी एक आहे.

आजपासून ९ दिवसांनी अशाचप्रकारे स्वत:च्या यानातून अंतराळात जाण्याच्या तयारीत असलेले अब्जाधीश आणि प्रतिस्पर्धी जेफ बेझोस यांच्यावर ७१ वर्षांच्या ब्रॅन्सन यांनी आघाडी घेतली आहे.

ब्रॅन्सन यांच्या ‘व्हर्जिन गॅलॅक्टिक’ कंपनीच्या व्हीएसस युनिटी नावाच्या अंतराळयानाने न्यू मेक्सिको येथून दीड तासांच्या मोहिमेवर उड्डाण केले. जमिनीपासून सुमारे १३ किलोमीटर अंतरावर त्यांचे यान मुख्य विमानापासून वेगळे झाले आणि त्याचे इंजिन प्रज्ज्वलित होऊन ते सुमारे ८८ किलोमीटर उंचीवर पोहचले. अंतराळवीरांच्या काही मिनिटांच्या वजनरहित अवस्थेनंतर हे यान रनवेवर उतरणार होते.

मूळ भारतीय वंशाची अमेरिकी नागरिक व एअरोनॉटिकल अभियंता सिरिषा बांदला ही या मोहिमेचा भाग असून, अंतराळात जाणारी ती भारतीय वंशाची तिसरी महिला ठरली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Billionaire richard branson in space zws
First published on: 12-07-2021 at 03:11 IST