एप्रिल २०२६ पासून भारतात देशभर E20 इंधन हेच सर्वसाधारणपणे विकलं जाणारं पेट्रोल बनलं आहे. कच्च्या तेलावरील आयात कमी करणं, प्रदूषण घटवणं आणि शेतकऱ्यांना मदत करणं हे या निर्णयामागील उद्देश असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी जूनमध्ये E20 ते E85 पर्यंत इथेनॉल मिश्रणावर चालणाऱ्या फ्लेक्स-फ्युएल वाहनांच्या उद्घाटनावेळी ही माहिती पुरी यांनी दिली होती. आता इथेनॉलमुळे मायलेज कमी होतं हे भाजपाने मान्य केलं आहे.
केंद्र सरकारचं नेमकं म्हणणं काय?
केंद्र सरकारच्या E20 इथेनॉल-मिश्रित पेट्रोल धोरणाविरोधात दिल्लीमध्ये तीन मोठी आंदोलनं होणार आहेत. या आंदोलनांना विरोधी पक्ष, वाहतूक संघटना आणि ‘E20 जनता पार्टी’ या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑनलाईन चळवळीचा पाठिंबा आहे. ‘E20 जनता पार्टी’ ची चळवळही सुरु झाली आहे. त्यांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलकांची प्रमुख मागणी अशी आहे की, E20 सोबत 100 टक्के शुद्ध पेट्रोलची विक्रीही सुरू ठेवावी, E20 पेट्रोलच्या किंमती कमी कराव्यात, तसंच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी राजीनामा द्यावा. सरकारनं मात्र या धोरणाचं समर्थन करत, ते ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचं म्हटलंय. अशातच भाजपाने एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात E20 इंधन म्हणजेच इथेनॉल मिश्रित इंधनामुळे मायलेज कमी होतो पण खूप फायदे होतात असं म्हटलंय आहे.
भाजपाने पोस्ट करत काय स्पष्ट केलंय?
१) चला मान्य केलं इथेनॉलमुळे मायलेज ५ टक्के कमी होतो. पण इतर फायदे किती आहेत हे तुम्ही पाहिलंत का?
२) चांगलं अॅक्सलेरेशन मिळतं, उत्तम पिक अप मिळतो.
३) हायर ऑक्टेन फ्युएल
४) उत्तम अँटी नॉकिंग
५) क्लिनर कंबशन
६) बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्येही वाहनाचा उत्तम परफॉर्मन्स
७) लाइफ सायकल कार्बन एमिशन्समध्ये ४० टक्के घट
प्रश्न फक्त मायलेजचा नाही, वाहनाच्या किंमतीचाही आहे
प्रश्न फक्त मायलेजचा नाही, प्रश्न तुम्ही वाहनासाठी खर्च केलेल्या किंमतीचाही आहे. जर एक इंधन गाडीचा परफॉर्मन्स सुधरवतं आहे, इंजिनची कार्यक्षमता वाढवतं आहे. तसंच हे इंधन पर्यावरणासाठीही उत्तम असेल तर थोडसं मायलेज घटलं म्हणत बोंब मारण्यात काय अर्थ आहे? असा प्रश्न भाजपाने विचारला आहे आणि इथेनॉल किती महत्त्वाचं आहे ते सांगितलं आहे. आता यावरुन विरोधक काय भूमिका घेणार तसंच CJP चं काही म्हणणं असणार का? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.
