‘भाजप -अकाली दल युती’ तुटता कामा नये -हर्षवर्धन

काँग्रेस शासनाला पराभूत करण्यासाठी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आपला ‘नैसर्गिक मित्रपक्ष’ शिरोमणी अकाली दलासोबतच लढविण्याचा

काँग्रेस शासनाला पराभूत करण्यासाठी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आपला ‘नैसर्गिक मित्रपक्ष’ शिरोमणी अकाली दलासोबतच लढविण्याचा निर्धार भाजपने व्यक्त केला आह़े  तसेच कोणत्याही परिस्थितीत ही युती तुटू नये, असे भाजपचे प्रयत्न असल्याचे भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार हर्षवर्धन यांनी म्हटले आह़े
दिल्ली अकाली दलाने २२ ऑक्टोबर रोजी एक प्रस्ताव संमत केला होता़  त्यानुसार ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत १६ जागा स्वबळावर लढविण्याची घोषणा करीत ही जुनी युती मोडण्याचे सूतोवाच पक्षाने केले होत़े  त्यानंतर भाजपने हा सावध पवित्रा घेतला आह़े  आम्ही अकाली दलसोबत अनेक वर्षे कार्यरत आहोत़  त्यामुळे मला ही युती तुटणे कधीही आवडणार नाही़  पक्षाचाही दृष्टिकोन हाच आह़े  युती अभेद्य राहावी यासाठी प्रयत्नही सुरू आहेत आणि निकाल सकारात्मक अशी अपेक्षा आहे, असेही हर्षवर्धन म्हणाल़े २००८ साली झालेल्या गेल्या निवडणुकीत अकाली दलाने चार जागांवर निवडणूक लढविली होती़  मात्र या सर्वच ठिकाणी त्यांचा पराभव झाला होता़

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp akali dal coalition should remain continue harshvardhan

ताज्या बातम्या