भाजप, रा. स्व. संघ हे ‘बनावट हिंदू’ – राहुल गांधी

स्वत:च्या फायद्यासाठी वापर करणारे ‘बनावट हिंदू’ आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला.

rahul-gandhi-new

नवी दिल्ली : भाजप आणि रा.स्व. संघ हे धर्माचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करणारे ‘बनावट हिंदू’ आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला.

काँग्रेसची विचारसरणी भाजप- संघाच्या अगदी विरुद्ध असून, यापैकी एकच विचारसरणी देशावर सत्ता गाजवू शकते, असे अ.भा. महिला काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त भाषण करताना राहुल म्हणाले.

देवी लक्ष्मी ही आपल्याला आपले लक्ष्य साध्य करण्यास मदत करणारी शक्तीची देवता आहे, तर दुर्गा देवी ही संरक्षण करणारी शक्तीची देवता आहे. आपल्या पक्षाने सरकारमध्ये असताना या शक्तींना बळ दिले आहे, सत्ताधारी भाजपने या शक्ती क्षीण केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. ‘हे कशाप्रकारचे हिंदू आहेत? हे खोटे हिंदू आहेत. हे हिंदू धर्माचा वापर करतात, धर्माची दलाली करतात, पण हे हिंदू नाहीत’, असा हल्ला त्यांनी चढवला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp and late union religion fake hindus congress leader rahul gandhi akp