नवी दिल्ली : मुस्लिमांना भाजपशी जोडून घेण्याच्या मोहिमेला गती देण्यात आली आहे. देशातील ६५ लोकसभा मतदारसंघांमध्ये १० मार्चपासून ही मोहीम राबवली जाणार असून राज्यातील भिवंडी व औरंगाबाद हे दोन मतदारसंघ निवडण्यात आल्याची माहिती भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी ‘’लोकसत्ता’शी बोलताना दिली.

गेल्या महिन्यामध्ये दिल्लीमध्ये झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत मुस्लीम समाजाशी प्रामुख्याने पासमांदा मुस्लिमांना पक्षाशी जोडून घेण्याचा निर्णय झाला होता. यासंदर्भात सखोल आखणी करण्यात आली असू मार्चपासून मोहिमेची अंमलबजावणी सुरू होईल. ३० टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लीम मतदार असलेल्या ६५ लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असे सिद्दिकी यांनी सांगितले.

Nashik, Chhagan Bhujbal, dada bhuse,
नाशिकच्या जागेवरून आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये वर्चस्वाची लढाई
AAP leader Atishi accused the central government of a conspiracy of President rule in Delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचा कट! ‘आप’च्या नेत्या आतिशी यांचा केंद्र सरकारवर आरोप; भाजपचे प्रत्युत्तर
pm Narendra Modi Kanhan
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा : नागरिकांना शर्ट, टोपी, सॉक्स काढायला लावले… काय आहे कारण ?
Vanchit Bahujan Aghadi
औरंगाबादमध्ये एमआयएमच्या विरोधात वंचितचा मुस्लीम उमेदवार, मतविभाजनाचा आणखी एक प्रयोग

महाराष्ट्रासह, जम्मू-काश्मीर, दिल्ली, हरियाणा, गोवा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, केरळ, बिहार आणि लडाख यांचा या मोहिमेमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी तेलंगणा, मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये यावर्षी विधानसभा निवडणूकही होत आहे. या मोहिमेसाठी राष्ट्रीय तसेच, राज्यस्तरीय चमू बनवला जणार असून मुस्लीम समाजातील प्रभावशाली लोक, व्यावसायिकांशी संपर्क साधला जाणार आहे. शिवाय, मुस्लिमांना आपलेसे करण्याच्या या मोहिमेत केंद्र सरकारच्या कल्याणाकारी योजना गरीब मुस्लिमांपर्यंत पोहोवल्या जाणार आहेत.

‘राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यापासून या समाजाचा भाजपबद्दल विश्वास वाढला आहे. आतापर्यंत भाजपच्या नेतृत्वाने कधीही पासमांदा मुस्लिमांकडे बघितले नव्हते. पण, नजीकच्या भविष्यात भाजपला फायदा मिळू शकेल. २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुका व विविधा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपसाठी मुस्लीम हे मतदारच नव्हते. यावर्षी होणाऱ्या नऊ राज्यांतील विधानसभा निवडणुका तसेच, लोकसभा निवडणुकीत पासमांदा मुस्लिम भाजपला मतदान करतील’, असे मत ‘राष्ट्रवादी मुस्लीम पासमांदा समाज’चे राष्ट्रीय अध्यक्ष आतिफ रशीद यांनी व्यक्त केले.

मुस्लिमांना जोडण्याची प्रक्रिया आत्ता सुरू झाली आहे. मुस्लीम एकदम भाजपशी कसे जोडले जातील. त्यासाठी दहा वर्षांची अखंड मोहीम चालवावी लागेल. मग, भाजपला खऱ्या अर्थाने राजकीय लाभ मिळेल. मुस्लिमांची ५० टक्के भाजपला मिळाली पाहिजेत. हा बदल होण्यासाठी ५-१० वर्षे लागतील.

-आतिफ रशीद, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी मुस्लिम पसमांदा समाज