नवी दिल्ली : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मतदारांना धमकावत असल्याचा आरोप करत सोमवारी भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने आयोगाला दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, “ममता बॅनर्जी यांना निवडणूक प्रचारातून अपात्र ठरवावे. तसेच तृणमूलच्या नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करावा.” या शिष्टमंडळात केंद्रीय मंत्री किरेन रिजेजू, पीयूष गोयल तसेच पक्षाचे नेते सुकांत मुजूमदार, अनिल बलुनी, खासदार अरुण सिंग यांचा समावेश होता.

भाजपने संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांमध्ये केंद्रीय सुरक्षा दल अधिकचे तैनात करण्यात यावे, अशी मागणी करत राज्यातील पोलीस यंत्रणा निष्क्रिय आणि सत्ताधाऱ्यांना मदत करत असल्याचाही आरोप केला आहे.