पीटीआय, श्रीनगर

जम्मू-काश्मीर विधानसभेमध्ये सलग तिसऱ्या दिवशी राज्याच्या विशेष दर्जावरून गोंधळ झाला. भाजपच्या अर्ध्याहून अधिक आमदारांना मार्शलच्या सहाय्याने सभागृहाबाहेर काढल्यानंतर भाजपच्या सर्व आमदारांनी सभागृहाबाहेर प्रतिविधानसभा स्थापन करून सत्र घेतले.जम्मू-काश्मीर विधानसभेमध्ये विशेष दर्जाच्या ठरावावरून गेले तीन दिवस रणकंदन सुरू आहे. गुरुवारी मार्शल आणि भाजपचे आमदार यांच्यात धक्काबुक्कीही झाली.

justin trudeau accepts Khalistani supporters in Canada
Canadian PM Justin Trudeau: सर्वच हिंदू मोदी समर्थक नाहीत, कॅनडाच्या पंतप्रधानांची टीका; म्हणाले “आमच्याकडे खलिस्तानी…”
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
AMU minority status upheld 1967 decision quashed by Supreme Court
‘एएमयू’चा अल्पसंख्याक दर्जा कायम, १९६७ चा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; नियमित खंडपीठात सुनावणी
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Vladimir putin Narendra Modi Reuters
Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”

शुक्रवारी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर ‘पाकिस्तानचा अजेंडा चालणार नाही,’ अशा घोषणा भाजप आमदारांनी सभागृहात दिल्या. सभागृहाच्या हौद्यातही काही आमदार उतरले. त्यांना मार्शलच्या सहाय्याने सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश विधानसभेचे अध्यक्ष अब्दुल रहीम रादर यांनी दिले.आमदारांना बाहेर काढल्यानंतर उर्वरित अकरा आमदारांनी सभात्याग केला. ८८ जागांच्या विधानसभेत भाजपचे २८ आमदार आहेत.

हेही वाचा >>>मुख्यमंत्र्यांसाठीचे सामोसे खाल्ले कुणी? CID करतेय चौकशी; राज्यभर त्याचीच चर्चा!

विशेष दर्जासंबंधी ठरावाला विरोध

सभागृहाबाहेर भाजपच्या आमदारांनी प्रतिविधानसभेची स्थापना केली. विशेष दर्जा पूर्ववत करण्याचा ठराव बेकायदा आणि घटनाबाह्य असल्याचे आमदार या वेळी म्हणाले. प्रतिविधानसभा ही नॅशनल कॉन्फरन्सच्या विरोधात आहे. या पक्षाने सभागृहाचा ताबा घेतला आहे, असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला. भाजप आमदार बळवंतसिंह मंकोटिया यांनी सांगितले, की नॅशनल कॉन्फरन्सच्या सदस्यांनी सभागृहाचा जवळपास ताबाच घेतला आहे. असे आम्ही होऊ देणार नाही. घटनात्मक संकट या पक्षाने उभे केले आहे. त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे.

Story img Loader