थेट लढतीत भाजप पराभूत; काँग्रेस नेत्यांचा दावा

 पंतप्रधान मोदींनी आता तरी हटवादीपणा सोडावा, तीन शेती कायदे मागे घ्यावेत आणि पेट्रोल-डिझेल-गॅसची दरवाढ करून लोकांना लुबाडणे थांबवावे.

नवी दिल्ली: काँग्रेसने थेट लढतीत भाजपला पराभूत केले आहे. हिमालच प्रदेश, राजस्थानमधील विजयाचा काँग्रेसला पंजाबमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होईल, असा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला. हिमाचल प्रदेशमधील चार, राजस्थानातील दोन, महाराष्ट्रातील एक, कर्नाटकातील दोनपैकी एक अशा पोटनिवडणुकीतील आठ जागांवर काँग्रेसने थेट आव्हान देत भाजपचा पराभव केला आहे.

 पंतप्रधान मोदींनी आता तरी हटवादीपणा सोडावा, तीन शेती कायदे मागे घ्यावेत आणि पेट्रोल-डिझेल-गॅसची दरवाढ करून लोकांना लुबाडणे थांबवावे. लोकांना होणारा हा त्रास भाजपसाठी धोकादायक ठरेल, अशी टीका काँग्रेसचे  प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली. राजस्थानमध्ये पक्षांतर्गत संघर्ष मोडून काढून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी  काँग्रेसच्या विजय मिळवून दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp defeated congress leaders claim akp

Next Story
VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक