भाजपा कार्यकारिणीची बैठक संपली ; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी केलं मार्गदर्शन, म्हणाले…

भाजपाचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव यांनी पत्रकारपरिषदेतून दिली सविस्तर माहिती

भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. या बैठकची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने झाली. तसेच, आगामी काळात ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांची देखील बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव यांनी पत्रकारपरिषदेतून या बैठकीबाबत माहिती दिली.

भूपेंद्र यादव म्हणाले की, “ आज सकाळपासून कार्यकारणीची बैठक सुरू होती. बैठकीच्या पहिल्या सत्रात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे भाषण झालं. तर, बैठकीच्या दुसऱ्या सत्रात गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्याचे प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांद्वारे आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण विषय मांडण्यात आला. राज्य सरकारकडून पाच वर्षांमध्ये जे काम करण्यात आलं त्याचा मुख्यमंत्र्यांनी लेखाजोखा मांडला. याचबरोबर जनेतशी जुडण्यासाठी त्यांच्यात विविध विषय नेण्यासाठी, विविध वर्गांसोबत समन्वय साधण्यासाठी पार्टीकडून ज्या विविध योजना आखण्यात आल्या आहेत त्याबाबत संपूर्ण माहिती तेथील प्रदेशाध्यक्षांनी दिली. या चार राज्यांशिवाय पंजाबच्या प्रदेशाध्यक्षांनी आगामी काळात भाजपा तयारीनिशी सर्व जागांवर निवडणूक लढवले असं सांगितलं गेलं.”

तसेच, “ यानंतर आजच्या या कार्यकारिणी बैठकीचे सांगता, पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाने झाली. पंतप्रधान मोदींनी आगामी काळात भाजपाची कार्यनिती बनवण्यासाठी एक मोठा मंत्र सर्व कार्यकर्त्यांना दिला. त्यांनी सांगितलं की, भाजपा कार्यकर्त्यांना सामान्य माणसाच्या मनाच्या विश्वासाचा सेतू बनलं पाहीजे. तसेच, त्यांनी पक्षाच्या इतिहासाचा दाखला देत सांगितलं की, भाजपाने केंद्रात आज जे स्थान मिळवलं आहे. त्याचं अतिशय मोठ कारण हे आहे की, सुरूवातीपासून आतापर्यंत भाजपा हा सामान्य माणसाशी जुडलेली असते. भाजपा ही कुटुंबावर आधारित पार्टी नाही. त्यामुळे भाजपा ज्या मुल्यांना घेऊन चालली आहे. त्यामध्ये सेवा, संकल्प आणि समर्पणाशी जोडून, कुण्या एका विशिष्ट कुटुंबाशी जोडून नाही तर पार्टीची परंपरा आहे. परंपरेला पुढे नेत व कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमामुळे आपण पुढे चाललो आहोत. त्यामुळे त्यांनी सांगितलं की आगामी काळात भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना या विश्वासाला घेऊन वाटचाल करावी लागेल. कोविड काळात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वात केवळ राजकारण नाही, तर सेवा परमो धर्म या तत्वानुसार काम केलं.” असं देखील यादव म्हणाले.

भाजपाचा उदय अजून व्हायचा आहे, बंगालमध्ये नवीन कथा लिहिणार; राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नड्डांचे आश्वासन

याचबरोबर,“ पंतप्रधान मोदी म्हणाले, भाजपा सातत्याने जो आदर्श विचार घेऊन पुढे चालली आहे. भाजपाने लोकशाही व्यवस्था मजबुत केली आहे. पंतप्रधान मोदींनी आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समस्त कार्यकर्त्यांना उत्साहाने पक्षाचे काम पुढे नेण्याचं आवाहन केलं.” अशीही माहिती भूपेंद्र यादव यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp executive meeting ends prime minister modi gives guidance on the backdrop of upcoming elections msr

ताज्या बातम्या