विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपकडून भ्रष्टाचाराचा मुद्दा ! नड्डा यांची उत्तराखंडमध्ये काँग्रेसवर टीका

नड्डा दोन दिवसांच्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर असून त्यांनी सोमवारी काँग्रेसवर टीका केली.

jp nadda
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा

नवी दिल्ली: हिमाचल प्रदेशमध्ये पोटनिवडणुकीतील चारही जागा काँग्रेसने जिंकल्यानंतर, या निकालांचा शेजारील उत्तराखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम होऊ नये याची दक्षता सत्ताधारी भाजप घेत आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेत आला तर भ्रष्टाचार सुरू होईल, असा प्रचार भाजपने सुरू केला असून राज्या-राज्यात काँग्रेस काळातील भ्रष्टाचाराचा बागुलबुवा मतदारांपुढे उभे करण्याची रणनिती आखली आहे. काँग्रेस आणि कमिशन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिथे काँग्रेस असेल, तिथे कमिशन (लाचखोरी) असेलच पण, जिथे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) असेल, तिथे स्वच्छ कारभार असेल,  असे नमूद करत भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी उत्तर प्रदेशनंतर उत्तराखंडमध्येही निवडणूक प्रचाराचे रणिशग फुंकले. नड्डा दोन दिवसांच्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर असून त्यांनी सोमवारी काँग्रेसवर टीका केली.  चमोलीमध्ये शहीद सन्मान यात्रेला  नड्डा यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. सुमारे ४० वर्षांमध्ये काँग्रेसने जवानांना आमिषे दाखवली, त्यांची दिशाभूल केली असा आरोप नड्डा यांनी केली. उत्तरखंडमध्ये भाजपची सत्ता असून वर्षभरात तिथे दोन मुख्यमंत्री बदलण्याची नामुष्की आली. उत्तराखंडमध्ये विधानसभेत काँग्रेसकडून तगडे आव्हान निर्माण होण्याची शक्यता असल्याने भाजपने काँग्रेस काळातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp jp nadda raises corruption issues in assembly election campaign zws

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या