scorecardresearch

गृहमंत्री अमित शाह यांच्या विमानाचं गुवाहाटीत आपत्कालीन लॅंडिंग; नेमकं कारण आलं समोर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विमानाचं बुधवारी रात्री गुवाहाटीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं आहे.

गृहमंत्री अमित शाह यांच्या विमानाचं गुवाहाटीत आपत्कालीन लॅंडिंग; नेमकं कारण आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (संग्रहित फोटो)

केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या विमानाचं बुधवारी रात्री गुवाहाटीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं आहे. गुवाहाटीच्या लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे लँडिंग करण्यात आलं. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आगरतळा येथे जात होते. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे त्यांच्या विमानाचं गुवाहाटीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. ते आजची रात्र गुवाहाटी येथील हॉटेल रॅडिसन ब्लू येथे राहणार आहेत. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आगरतळा दौऱ्यावर जात आहेत. भाजपाने त्रिपुरात रथयात्रेचं आयोजन केलं आहे. याच रथयात्रेचं उद्घाटन करण्यासाठी अमित शाह गुरुवारी सकाळी आगरतळाला रवाना होणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 00:15 IST

संबंधित बातम्या