आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून कर्नाटकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. यावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये टीका टीप्पणी सुरू आहे. अशातच भाजपा नेते नलीनकुमार कतील यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं आहे. टीपू सुलतानच्या समर्थकांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही, असं ते म्हणाले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आगामी निवडणूक टीपू सुलतान विरुद्ध सावरकर अशी होईल, असं विधान केलं होतं.
काय म्हणाले नलीनकुमार कतील?
कर्नाटमधील येलाबुरगा येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना कतील म्हणाले, “आम्ही टीपू सुलतानचे वंशज नाही, तर आम्ही राम आणि बजरंगबलीचे भक्त आहोत. आम्ही टीपू सुलतानच्या वंशजांना राज्यातून बाहेर काढलं आहे. जे लोक टीपू सुलतानचे समर्थन करतात त्यांना जिवंत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. जे लोक भगवान राम आणि बजरंगबलीचे भक्त आहेत, तेच लोक कर्नाटकमध्ये राहतील.”
हेही वाचा – “गुजरातमध्ये जे घडले ते…” प्राप्तिकर विभागाकडून BBC कार्यालयांच्या ‘पाहणी’वर ओवैसींची प्रतिक्रिया
काही दिवसांपूर्वीच त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक टीपू सुलतान विरुद्ध सावरकर अशी होईल, असं विधान केलं होतं. तसेच काँग्रेसने टीपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला होता, याची काहीही आवश्यकता नव्हती, असंही ते म्हणाले होते.
हेही वाचा – तेलंगाणात काँग्रेस १०० राम मंदिर उभारणार? प्रदेशाध्यक्षांनी केले मोठे विधान, म्हणाले “आमचे सरकार आल्यास…”
दरम्यान, राजकीय नेत्यांनाकडून स्वत:च्या सोयीनुसार टीपू सुलतानच्या नावाचा वापर होत असल्याचे म्हणत टीपू सुलतानाच्या वंशजांनी नाराजी व्यक्त केली होती. संदर्भात न्यूज १८ शी बोलताना, “राजकीय नेते त्यांच्या सोईप्रमाणे टीपू सुलतान यांचे नाव वापरतात. असं करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. यापुढे टीपू सुलताना यांच्या नावाचा गैरवापर करण्याऱ्यांविरोधात आम्ही अब्रुनुकसानी दावा दाखल करू”, अशी प्रतिक्रिया मन्सूर अली यांनी दिली होती.