केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाकव्याप्त कश्मीरच्या मुद्यावरुन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या धोरणावर टीका करत काँग्रेला लक्ष्य केलं. त्यांनी कश्मीरचा मुद्दा हा भारताचा अंतर्गत विषय होता. पंडित नेहरुंनी त्याला जागतिक पातळीवर नेण्याची गरज नव्हती असे वक्तव्य केलं. त्या राज्यसभेत बोलत होत्या.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत पाकव्याप्त कश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी बोलताना “भारत देशासाठी हा महत्त्वाचा विषय आहे. पाकव्याप्त कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असा ठराव १९९१ मध्ये मंजूर करण्यात आला. हा भारताशी संबंधित मुद्दा होता. मात्र अभ्यास केल्यानंतर समजतं की या मुद्द्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचे काम काँग्रसने केले,” असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.

Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
Sanjay Singh alleges that Arvind Kejriwal is not allowed to meet his family face to face
केजरीवाल यांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न! कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचा संजय सिंह यांचा आरोप
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”

तसेच “काँग्रेस हा मुद्दा संयुक्त राष्ट्रामध्ये नेला. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू या मुद्द्याला संयुक्त राष्ट्रामध्ये घेऊन गेले, असे अभ्यास केल्यानंतर समोर येते. त्यांनी असं का केलं ? कारण अभ्यास केल्यानंतर समजलं की १९४७ च्या डिसेंबरमध्ये ब्रिटिशांनी नेहरुंना हा मुद्दा संयुक्त राष्ट्रामध्ये घेऊन जाण्याचा सल्ला कदाचित दिला असावा. काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय बनवण्यात आला. पाकिस्तान त्याचा दुरुपयोग करत आहे. हा मुद्दा जागतिक स्तरावर जायला नको होता” असंदेखील निर्मला सीतारामन म्हणाल्या.

दरम्यान, भाजपाकडून पंडित जवाहरलाल नेहरू यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन यापूर्वी अनेकदा लक्ष्य करण्यात आलंय. त्यानंतर आता पुन्हा एकदा निर्मला सीतारामन यांनी कश्मीरच्या मुद्द्यावरुन पंडित नेहरुंचा संदर्भ देत काँग्रेसला घेरलं आहे.