हरियाणातील पुरुषांच्या लग्नासाठी आता बिहारी मुली

मुलींची संख्या कमी असणाऱ्या हरियाणातील अविवाहित पुरुषांच्या लग्नासाठी बिहारमधून मुली आणण्याचे वक्तव्य करत, भाजप नेते ओ.पी. धनखर यांनी टीका ओढवून घेतली.

मुलींची संख्या कमी असणाऱ्या हरियाणातील अविवाहित पुरुषांच्या लग्नासाठी बिहारमधून मुली आणण्याचे वक्तव्य करत, भाजप नेते ओ.पी. धनखर यांनी टीका ओढवून घेतली. हरियाणात दर हजार पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण ८७९ इतके खाली आले आहे. परिणामी राज्यातील तरूणांना लग्नासाठी जोडीदार मिळवणे अवघड झाले आहे. या संदर्भाचा आधार घेत, भाजप नेते ओ.पी. धनखर यांनी हरियाणातील तरूणांसाठी बिहारमधूनच मुली आणण्याचे आश्वासन देत एकच खळबळ उडवून दिली. या वक्तव्यानंतर टीकेची राळ उठल्यानंतर सारवासारव करताना, धनखर यांनी प्रसारमाध्यमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगितले. हरियाणातील तरूण जोडीदार शोधण्यासाठी देशभर फिरत असून, त्यांना लग्नासाठी जोडीदार मिळावा हाच आपला प्रामाणिक उद्देश असल्याचे धनखर यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp leader promises brides from bihar for haryana men