बलात्काराचा आरोप असणारे भाजपा नेते स्वामी चिन्मयानंद यांची गुरुवारी रात्री पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी सार्वजनिकपणे आरोप करत ब्लॅकमेल तसंच वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांकडून ही चौकशी करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री असणाऱ्या स्वामी चिन्मयानंद यांची जवळपास सात तास चौकशी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाकडून गठीत करण्यात आलेल्या विशेष तपास समितीकडून (एसआयटी) ही चौकशी करण्यात आली.

पोलिसांनी अद्याप या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात केंद्रीय राज्यमंत्री असणाऱ्या स्वामी चिन्मयानंद यांच्या नावे अनेक आश्रम आणि शैक्षणिक संस्था आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ६ वाजता पोलिसांनी सुरु केलली चौकशी रात्री १ वाजेपर्यंत सुरु होती. यावेळी त्यांनी मुलीकडून करण्यात आलेल्या आरोपांसंबंधी विचारण्यात आलं. मुलीने आपल्यावर बलात्कार करत त्याचा व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आलं, तसंत त्या व्हिडीओची धमकी देत वारंवार लैंगिक शोषण करण्यात आल्याचं आरोपात म्हटलं आहे. स्वामी चिन्मयानंद यांच्या वकिलांनी आपण पोलिसांनी तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचं सांगितलं आहे.

स्वामी चिन्मयानंद यांचा निर्वस्त्र मसाज घेतानाचा कथित व्हिडीओ व्हायरल

स्वामी चिन्मयानंद यांचा निर्वस्त्र मसाज घेतानाचा कथित व्हिडीओ व्हायरल

दरम्यान एसआयटीने आपण मुलीची १५ तास चौकशी केल्याचं वृत्त फेटाळलं आहे. तसंच स्वामी चिन्मयानंद यांची चौकशी कऱण्यापासून पळ काढत असल्याचा आरोपही फेटाळला आहे. “आम्ही स्वामी चिन्मयानंद यांची चौकशी करत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. आम्ही त्यांना तीन दिवसांपुर्वी समन्स बजावलं होतं. पण आम्हाला तब्बेतीचं कारण सांगण्यात आलं. पुढील काही दिवस त्यांची चौकशी सुरु राहिल,” अशी माहिती एसआयटीने दिली आहे.

ब्लॅकमेल केलं जात असल्याचा मुलीचा आरोप
आपल्यावर बलात्कार करताना चित्रफित काढत त्याच्या आधारे ब्लॅकमेल करण्यात आल्याचा मुलीचा आरोप आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने दिल्ली पोलीस आणि दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेल्या जबाबात आपल्यावर चिन्मयानंद यांच्याकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती दिली आहे. चिन्मयानंद यांचे अनेक आश्रम तसंच शैक्षणिक संस्था आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून गठीत करण्यात आलेल्या विशेष तपास समितीसमोर (एसआयटी) पीडित मुलीने वारंवार आपल्या आरोपांची पुनरावृत्ती केली. यावेळी त्यांनी मुलीने सादर केलेले व्हिडीओचींदेखील पाहणी केली.

आपल्या १२ पानांच्या तक्रारीत पीडित मुलीने सांगितलं आहे की, गतवर्षी जून महिन्यात तिची चिन्मयानंद यांच्यासोबत प्रथम भेट झाली. चिन्मयानंद यांच्या शहाजहानपूर येथील कॉलेजमध्ये कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी पीडित मुलगी गेली होती. चिन्मयानंद यांनी आपला फोन नंबर घेतला आणि प्रवेश मिळण्याची व्यवस्था केली. त्यांनी नंतर फोन करुन आपल्याला नोकरीची ऑफर दिली आणि पाच हजार पगार मिळेल सांगितलं. आपलं कुटुंब गरिब असल्या कारणाने आपण नोकरी स्विकारली असं मुलीने सांगितलं आहे.

आरोप करण्यात आल्यानुसार, चिन्मयानंद यांनी मुलीला ऑक्टोबर महिन्यात हॉस्टेलमध्ये येऊन राहण्यास सांगितलं. नंतर त्यांनी तिला आश्रममध्ये बोलावलं. यावेळी त्यांनी माझा आंघोळ करतानाचा व्हिडीओ दाखवत व्हारल करण्याची धमकी दिली आणि बलात्कार केला असं मुलीने तक्रारीत सांगितलं आहे. यावेळी चिन्मयानंद यांनी बलात्कार करताना व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं आणि त्याच्या आधारे ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. चिन्मयानंद यांचे सहकारी बंदुकीचा धाक दाखवत आपल्याला घेऊन जायचे असा मुलीचा आरोप आहे.

गतवर्षी जुलै महिन्यापर्यंत हा प्रकार सुरु होता. पण नंतर मुलीने व्हिडीओलाच पुरावा करत चिन्मयानंद यांच्याविरोधात जाण्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट महिन्यात मुलीने फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट केला आणि पळून गेली. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी कुटुंबाची तक्रार दाखल करुन घेतली. मात्र यावेळी एफआयआर दाखल केला गेला नाही. नंतर मुलगी राजस्थानमध्ये सापडली. सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांनी तिला न्यायालयात हजर करण्यास सांगितलं. ३० सप्टेंबर रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे.