भारतीय जनमानस हेलावून टाकणाऱ्या दादरी हत्याकांडप्रकरणी उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्ध पोलीस ठाण्याकडून १५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपपत्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेत्याचा मुलगा विशाल राणा आणि त्याचा चुलत भाऊ शिवम यांचे मुख्य आरोपी म्हणून नाव आहे. या दोघांनी मिळूनच जमाव मोहंमद अखलाखच्या घरी नेला होता, असा आरोप पोलिसांनी ठेवला आहे.
दादरी येथील मोहंमद अखलाक यांना घरात गोमांस बाळगल्याच्या आरोपावरून जमावाने ठेचून मारल्याची नृशंस घटना २८ सप्टेंबर रोजी घडली होती. त्यांचा मुलगा दानिश या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. या घटनेमुळे देशातील वातावरण ढवळून निघाले होते. या हत्याकांडाशी संबंधित ७ आरोपींची मागील दोन दिवसांत धरपकड करण्यात आली. पंधरा जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून बुधवारी अटक करण्यात आलेल्या आणखी दोघांविरोधात अतिरिक्त आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. दोघा फरारींचा शोध सुरू असूनही तेही लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील, अशी माहिती ग्रेटर नोएडाचे पोलीस उपअधीक्षक अनुराग सिंग यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leaders son among 15 named in dadri lynching chargesheet
First published on: 24-12-2015 at 14:52 IST