जालंधर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंजाबमध्ये भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीमुळे पंतप्रधानांना ५ जानेवारीचा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. फिरोजपूर येथे निदर्शकांनी रस्ता रोखून धरल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर प्रथमच पंतप्रधान पंजाब दौऱ्यावर गेले होते.

    नवा पंजाब घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, हे राज्य कर्जमुक्त असेल तसेच प्रत्येकाला संधी उपलब्ध होतील तसेच दलितांचा सन्मान राखला जाईल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. भ्रष्टाचाराला तेथे कोणताही थारा नसेल, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या धोरणांमुळे राज्यातील उद्योगधंद्यांचे नुकसान झाले असून, भाजप्रणीत आघाडीकडे नवा पंजाब घडविण्याची दृष्टी आहे. पंजाबमध्ये काँग्रेस कधीही काम करू शकत नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. जे पक्षातच एकमेकांविरोधात संघर्ष करतात ते स्थिर सरकार कसे देतील? असा सवाल त्यांनी काँग्रेसमधील गटबाजीवर केला.

  काही लोक येथे येऊन खोटी आश्वासने देतात, अशा शब्दांत त्यांनी आम आदमी पक्षावर टीका केली. पंजाबला अमली पदार्थापासून मुक्त करू, असे आश्वासन देतात, मात्र रस्त्यावर मद्याची दुकाने थाटण्यात ते तज्ज्ञ आहेत, असा टोला त्यांनी ‘आप’ला लगावला.

‘देवी तलाव मंदिर दर्शनाची इच्छा    पंजाब प्रशासनामुळे अपूर्ण’

जालंघर येथील सभेत त्यांनी राज्यातील सत्तारूढ काँग्रेसबरोबरच आम आदमी पक्षावर टीकास्त्र सोडले. पंजाब दौऱ्यात देवी तलाब मंदिरात दर्शनाला जाण्याची इच्छा होती. मात्र प्रशासनाने याबाबत तयारी केली नाही, अशी नाराजी व्यक्त करत, पंजाबमधील काँग्रेस सरकारवर पंतप्रधानांनी टीकास्त्र सोडले. पुन्हा जालंधर येऊन दर्शन घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp led government in punjab prime minister narendra modi confidence in the meeting in jalandhar akp
First published on: 15-02-2022 at 00:27 IST