मध्यप्रदेशमधील रतलाम येथील भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार प्रल्हाद पटेल यांचा अचंबित करणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ज्यांच्या घरांवर काँग्रेस पक्षाचा झेंडा आहे, तो काढून टाकण्याचे पटेल सांगत आहेत. तसेच ज्यांच्या घरावर काँग्रेसचा झेंडा आहे, त्यांच्या सर्व सुविधा बंद करा, असे ते आपल्या सहकाऱ्यांना सांगताना दिसत आहे. पटेल यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> राष्ट्रवादीची मोठी घोषणा! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत २७ टक्के उमेदवार फत्त OBC समाजाचे

या व्हिडीओमध्ये रतलाम येथील भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार प्रल्हाद पटेल एका सभेत बोलताना दिसत आहेत. “ज्या घरांवर काँग्रेसचे झेंडे लावलेले आहेत, त्या सर्व घरांचे फोटो काढा आणि त्यांच्या सर्व सुविधा बंद करा. दहा पाच मतं कमी मिळाली तरी काही फरक पडणार नाही. पण यांना अद्दल घडवा,” असे पटेल बोलताना दिसत आहेत. त्यानंतर दिग्विजय सिंह यांनी भाजपावर टीका केली आहे. भाजपाची ही लोकशाही आहे, असे उपहासात्मक ट्वीट करुन त्यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे.

हेही वाचा >>> “सर्वोच्च न्यायालय आमच्या खिशात आहे अशी…”; एकनाथ शिंदे गटाविरुद्धच्या न्यायालयीन लढाईवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

याआधीही प्रल्हाद पटेल यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते सभेमध्येच गाणे गाताना दिसले होते. सभा सुरु असताना त्यांनी ‘तेरे जैसा यार कहां, कहां ऐसा याराना’हे गाणं म्हटलं होतं. त्यांचा हा व्हिडीओदेखील चांगलाच व्हायरल झाला होता. प्रल्हाद पटेल यांचे रतलाम येथे एक मोठे हॉटले आहे. तसेच वॉटर पार्क आणि एक मंगल कार्यालयही त्यांच्या मालकीचे आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mayor candidate prahlad patel said take down congress flag digvijay singh criticizes prd
First published on: 11-07-2022 at 15:45 IST