मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री महेंद्रसिंह सिसौदिया यांनी वाढत्या महागाईबाबत केलेल्या विधानावरून राजकारण तापलं आहे. काँग्रेसकडून आता पलटवार देखील करण्यात आला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी म्हटले की, मध्यप्रदेशचे मंत्री म्हणतात, लोकांचे उत्पन्न देखील वाढले आहे, त्यामुळे त्यांनी वाढत्या किंमतींना देखील स्वीकारलं पाहीजे. मात्र खर तर हे आहे की केवळ भाजपाच्या लोकांचे उत्पन्न वाढले आहे, सर्वसामान्य जनतेचे नाही.

मध्य प्रदेश सरकारचे मंत्री महेंद्र सिहं यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना जेव्हा म्हटले की, उत्पन्न वाढत आहे तर लोकांनी महागाईचा देखील स्वीकर केला पाहीजे. त्यांनी हे देखील म्हटलं की सरकार नागरिकांना प्रत्येक वस्तू मोफत नाही देऊ शकत. तर, पेट्रोलियम पदार्थांवरील कराबाबत बाजू मांडताना त्यांनी सांगितले की, यातून सरकारला महसूल मिळतो, जो शेवटी विकार आणि जनहीतच्या सरकारी योजनांसाठी कामी येतो.

काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी यावर पलटवार करत म्हटले की, “भाजपाचे मंत्री म्हणतात की, उत्पन्न वाढले आहे. मात्र उत्पन्न जनतेचे नाही वाढले, तर केवळ त्यांचेच वाढले आहे. इंधन, घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. ते गरिबांबद्दल नाही विचार करत. मला आशा आहे की लोक या सरकारला उखडून फेकतील आणि याची सुरूवात उत्तर प्रदेशमध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपाच्या पराभवाने होणार आहे.”