बॉलिवूड अभिनेते आणि भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार परेश रावल यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते मंगळवारी भाजपाचा प्रचार करण्यासाठी वलसाड येथे गेले होते. यावेळी त्यांनी बंगाली लोकांबाबत केलेल्या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींवर भाष्य करताना परेश रावल म्हणाले, “गुजराती जनता महागाई सहन करेल, पण बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना सहन करू शकत नाही. गॅस सिलिंडर घेऊन तुम्ही काय करणार आहात? तुम्ही बंगाली लोकांसाठी मासे शिजवणार आहात का?” असं विधान रावल यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर बंगाली लोकांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. लोकांचा रोष लक्षात घेता परेश रावल यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे.

इंडिया सत्तेत आल्यास ‘सीएए’ रद्द करणार! माकपच्या टीकेवर चिदम्बरम यांचा खुलासा
Dindori lok sabha election 2024, Communist Party of India (Marxist), jiva pandu gavit
दिंडोरीत कार्यकर्त्यांच्या दबावामुळे माकप उमेदवार उभा करणार
Mira Bhayander BJP office bearer enters Shiv Sena Thackeray faction
राज ठाकरेंच्या महायुतीच्या पाठिंबामुळे उत्तर भारतीय नाराज; मिरा भाईंदर भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला
sanjay raut slams raj thackeray
Raj Thackeray : नवनिर्माणचं ‘नमोनिर्माण’ होण्यामागे कारण काय? संजय राऊत यांची राज ठाकरेंवर खोचक टीका

हेही वाचा- VIDEO: राऊतांना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली, शिवी देत म्हणाले, “*** तू यापुढे…”

दिलगीरी व्यक्त करताना परेश रावल ट्विटरवर म्हणाले, “मासे हा मूळ मुद्दा नाही. कारण गुजराती लोकही मासे शिजवतात आणि खातात. पण मी स्पष्ट करू इच्छितो की, अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्या लोकांना उद्देशून मी बंगाली म्हटलं होतं. पण तरीही माझ्या बोलण्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो.”