"गॅस सिलिंडर दिला तर बंगाल्यांसाठी मासे शिजवणार का?", परेश रावल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बंगाली नाराज | bjp mp and actor paresh rawal statement on bangali cook fish gas cylinders rmm 97 | Loksatta

“गॅस सिलिंडर दिला तर बंगाल्यांसाठी मासे शिजवणार का?”, परेश रावल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बंगाली नाराज

बॉलिवूड अभिनेते आणि भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार परेश रावल यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

“गॅस सिलिंडर दिला तर बंगाल्यांसाठी मासे शिजवणार का?”, परेश रावल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बंगाली नाराज
फोटो-इंडियन एक्स्प्रेस

बॉलिवूड अभिनेते आणि भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार परेश रावल यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते मंगळवारी भाजपाचा प्रचार करण्यासाठी वलसाड येथे गेले होते. यावेळी त्यांनी बंगाली लोकांबाबत केलेल्या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींवर भाष्य करताना परेश रावल म्हणाले, “गुजराती जनता महागाई सहन करेल, पण बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना सहन करू शकत नाही. गॅस सिलिंडर घेऊन तुम्ही काय करणार आहात? तुम्ही बंगाली लोकांसाठी मासे शिजवणार आहात का?” असं विधान रावल यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर बंगाली लोकांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. लोकांचा रोष लक्षात घेता परेश रावल यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे.

हेही वाचा- VIDEO: राऊतांना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली, शिवी देत म्हणाले, “*** तू यापुढे…”

दिलगीरी व्यक्त करताना परेश रावल ट्विटरवर म्हणाले, “मासे हा मूळ मुद्दा नाही. कारण गुजराती लोकही मासे शिजवतात आणि खातात. पण मी स्पष्ट करू इच्छितो की, अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्या लोकांना उद्देशून मी बंगाली म्हटलं होतं. पण तरीही माझ्या बोलण्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो.”

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 18:14 IST
Next Story
“जाहिरातीत सांगितल्यापेक्षा गाडी कमी मायलेज देते”, ग्राहकाची कोर्टात याचिका, निकाल देताना कोर्टानं संगितलं…!