भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली मतदारसंघाचा आमदार असणाऱ्या गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. गंभीरनेच यासंदर्भातील तक्रार पोलिसांकडे केल्यामुळे या प्रकरणाचा खुलासा झालाय. गंभीरने तक्रार केल्याचा खुलासा पोलिसांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केलाय.

दिल्ली मध्यच्या पोलीस उपायुक्त श्वेता चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम गंभीरने जीवे मारण्याची धमकी आल्यासंदर्भात तक्रार नोंदवलीय. “भाजपाचे पूर्व दिल्लीचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी दिल्ली पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना आयएसआयएस काश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. या प्रकरणामध्ये आम्ही तपास करत आहोत. तसेच गौतम गंभीर यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा आम्ही वाढवली आहे,” असं श्वेता यांनी सांगितलं.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

गंभीरच्या कार्यालयामधून यासंदर्भातील एक पत्र पोलिसांना पाठवण्यात आलाय. या पत्रामधील मजकुरानुसार गंभीरला त्याच्या ई-मेलवरुन ही धमकी देण्यात आलीय. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ९ वाजून ३२ मिनिटांनी आलेल्या एका ई-मेलमध्ये खसदार गौतम गंभीर आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. या प्रकरणामध्ये तुम्ही लक्ष घालून तपास करावा, असं पत्रात म्हटलं आहे.

गौतम गंभीर हा भारताचा माजी क्रिकेटपटू असून सध्या तो पूर्व दिल्ली मतदारसंघामधून भाजपाचा खासदार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तो या मदतारसंघातून निवडून आला आहे.