संविधानच्या प्रस्तावनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ शब्द वगळण्यासाठी भाजपचे राज्यसभा सदस्य भीम सिंह यांनी शुक्रवारी राज्यसभेत संविधान (दुरुस्ती) विधेयक, २०२५ सादर केले.
संविधानच्या प्रस्तावनेत ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ शब्दांची आवश्यकता नसून आणीबाणी काळात अलोकतांत्रिक पद्धतीने समावेश करण्यात आला होता, असा दावा करतानाच हे दोन्ही शब्द भ्रम निर्माण करतात आणि १९५० पासून लागू असलेल्या संविधानात हे दोन्ही शब्द नव्हते, असे भीम सिंह म्हणाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी काळात ४२व्या दुरुस्तीअंतर्गत संविधानात या दोन्ही शब्दांचा समावेश केला होता व त्यावेळी संसदेत कोणतीही चर्चा झाली नव्हती, असे ते म्हणाले.
