कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ची ३० जानेवारी रोजी सांगता झाली. या यात्रेचे नेतृत्व खासदार राहुल गांधी यांनी केले. आपल्या या यात्रेदरम्यान ते अनेक लोकांना भेटले. तसेच या यात्रेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज लोकांनी सहभाग नोंदवला. यात्रा सुरू असताना राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यातील बहीण-भावांच्या नात्याचा वेगळा पैलू दिसला. काश्मीरमध्ये असताना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी बर्फवृष्टींचा आनंद लुटताना दिसले. यावरच आता भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांनी विधान केले आहे. मोदी यांच्या धोरणांमुळे प्रियंका गांधी आणि राहुल गांधी काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा आनंद लुटू शकले, असे तरुण चुग म्हणाले.

हेही वाचा >>> विकासाचा वेग संथच! आर्थिक पाहणी अहवाल : पुढील वर्षी ‘जीडीपी’ ६ ते ६.८ टक्क्यांपर्यंत

pune dispute within congress marathi news
पुणे काँग्रेसमधील मानापमान नाट्य सुरूच
Uneasiness in Congress as Priyanka Gandhi is not getting a meeting
चंद्रपूर : प्रियंका गांधींची सभा मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची सभाही रद्द
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम
Wardha, complaint of Ramdas Tadas
वर्धा : बनावट व्हिडीओ प्रसारित करणे भोवले, रामदास तडस यांच्या तक्रारीवरून काँग्रेसच्या अ‍ॅडमीनवर गुन्हे दाखल

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादाप्रती झिरो टोलरन्स धोरणामुळेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकले,” असे तरुण चुग म्हणाले.

“राहुल गांधी कोणत्याही परवानगीशिवाय काश्मीरमध्ये जाऊ शकले. तसेच कोणत्याही अडथळ्याशिवाय ते लाल चौक परिसरात तिरंगा फडकवू शकले. त्यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानायला हवेत,” असेही तरुण चुग म्हणाले.

हेही वाचा >>> PM CARES फंडवर सरकारची मालकी नाही, मोदी सरकारची न्यायालयात माहिती

दरम्यान, ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची ३० जानेवारी रोजी सांगता झाली. या यात्रेदरम्यान राहुल गांधी तसेच काँग्रेसच्या अन्य कार्यकर्त्यांनी एकूण ४०८० किलोमीटरपर्यंत पायी प्रवास केला. ही यात्रा एकूण ७५ जिल्हे आणि १२ राज्यांतून गेली.