उत्तर प्रदेश भाजपला नवसंजीवनी

उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणूक, कॅण्टॉनमेण्ट बोर्ड निवडणूक आणि विधान परिषदेची द्वैवार्षिक निवडणूक यामध्ये पाठोपाठ पराभव पत्करावा लागल्याने

उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणूक, कॅण्टॉनमेण्ट बोर्ड निवडणूक आणि विधान परिषदेची द्वैवार्षिक निवडणूक यामध्ये पाठोपाठ पराभव पत्करावा लागल्याने हादरलेल्या भाजपने राज्यात पुन्हा जम बसविण्यासाठी पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर प्रदेशात २०१७ च्या पूर्वार्धात विधानसभेच्या निवडणुका होणार असून त्यासाठी संघटनेला अधिकाधिक सशक्त करण्याचा पक्षाचा मानस आहे, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले. सततच्या पराभवामुळे आम्ही खचलो असल्याचेही या नेत्याने मान्य केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp new lifesaving in uttar pradesh