संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत प्रवास करत असलेलं Mi- 17V5 हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धक्का बसला आहे. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी तसंच इतर १४ वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. बिपीन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसंच चौघांचा मृत्यू झाला असून इतर जखमींवर वेलिंग्टन येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; घटनास्थळी बचावकार्य सुरु

बिपीन रावत रुग्णालयात दाखल; कॅबिनेट बैठकीत राजनाथ सिंग यांनी मोदींना दिली माहिती

नितीन गडकरी यांनी दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर ट्वीट करत म्हटलं आहे की, “सीडीएस बिपीन रावतजी प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरची दुर्घटना झाल्याचं समजल्यानंतर धक्का बसला आहे. प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो”.

इतर नेत्यांचंही ट्विट

मोदींना देण्यात आली माहिती

दिल्लीत कॅबिनेट बैठक सुरु असून यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घटनेची माहिती दिली आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना झाली. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांचे कुटुंबीय या Mi- 17V5 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं असून स्थानिकदेखील मदत करत आहेत. मात्र अपघात झालेलं ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्याने तिथे पोहचण्यास अडचणी येत आहेत.

हवाई दलाकडून चौकशीचा आदेश

हवाई दलाने बिपीन रावत या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते याला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेशही देण्यात आल्याचं हवाई दलाने सांगितलं आहे.

दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र तांत्रिक कारणामुळे दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp nitin gadkari shocked to hear about the tragic crash of helicopter with cods shri bipin rawat sgy
First published on: 08-12-2021 at 14:41 IST