लोकसभेचे भाजपा खासदार रमेश बिधुरी यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. रमेश बिधुरी यांनी बहूजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. यानंतर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आपसह विविध विरोधी पक्षांनी बिधुरी यांच्या वक्तव्यावरून भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. अशातच भाजपाकडून रमेश बिधुरी यांच्याविरोधात मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं?

रमेश बिधुरी संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी लोकसभेचा चांद्रयान-३च्या यशबाबत बोलत होते. तेव्हा बसपाचे खासदार दानिश अली यांनी चांद्रयान-३ मोहिमेचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाटल्याचा आरोप केला. त्यावर रमेश बिधुरी संतापले आणि अपशब्दांचा उपयोग केला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा : “मी एखादी गोष्ट ठरवली तर…”, ‘त्या’ प्रकरणावरून राहुल गांधींचा भाजपाला इशारा

रमेश बिधुरी काय म्हणाले?

“मोदीजी श्रेय घेत नाहीयेत. श्रेय देशाचे वैज्ञानिक घेत आहेत. ए भ**…ए उग्रवादी..बोलू देणार नाही तुला कधी उभं राहून. सांगून ठेवतोय. ए उग्रवादी..कठुवे…हे दहशतवादी आहेत… उग्रवादी आहेत.. हे मुल्ला दहशतवादी आहेत. याचं काही ऐकू नका, बाहेर फेका याला”, असं रमेश बिधुरी म्हणत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

बिधुरी यांना नोटीस

यानंतर आता दानिश अली यांच्याबाबत वापरलेल्या अपशब्दांबद्दल रमेश बिधुरी यांना भाजपाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सूचनेवरून बिधुरी यांना भाजपाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी ‘एएनआय’ला दिली आहे.

हेही वाचा : “दहशतवादी ऐकण्याची मला सवय आहे, पण…”, भाजपा खासदाराच्या शिवीगाळ प्रकरणावर ओमर अब्दुलांचा संताप

राजनाथ सिंह यांची माफी

संरक्षण मंत्री राजनाथ शिंहे यांनी बिधुरी यांच्या विधानांवरून लोकसभेत दिलगिरी व्यक्त केली आहे. “जर (सत्ताधारी) सदस्यांच्या कोणत्याही विधानामुळे विरोधी पक्षांच्या भावना दुखावल्या अशतील, तर मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो’, असं राजनाथ सिंह म्हणाले.

Story img Loader