scorecardresearch

गुजरातमध्ये ऑलिम्पिक आयोजनाचे भाजपचे आश्वासन; समान नागरी कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करू : नड्डा

गुजरातमधील मदरशांचे सर्वेक्षण आणि वक्फ मंडळाच्या मालमत्तेची छाननी करण्याचे आश्वासनही भाजपच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.

गुजरातमध्ये ऑलिम्पिक आयोजनाचे भाजपचे आश्वासन; समान नागरी कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करू : नड्डा
समान नागरी कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करू : नड्डा

पीटीआय, गांधीनगर : समान नागरी कायद्याची अंमलबजावणी, दहशतवादाचा धोका टाळण्यासाठी कट्टरताविरोधी कक्षाची स्थापना आणि गुजरातमध्ये ऑलिम्पिकचे आयोजन अशी प्रमुख आश्वासने देणारा भाजपचा गुजरात निवडणूक जाहीरनामा शनिवारी प्रसिद्ध करण्यात आला.

गुजरातमधील मदरशांचे सर्वेक्षण आणि वक्फ मंडळाच्या मालमत्तेची छाननी करण्याचे आश्वासनही भाजपच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. त्याचबरोबर येत्या पाच वर्षांत २० लाख रोजगारसंधी, महिलांसाठी एक लाखाहून अधिक सरकारी नोकऱ्या  आणि राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्याच्या आश्वासनांचाही या जाहीरनाम्यात समावेश आहे.  गुजरात विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये होत आहे. त्या अनुषंगाने शनिवारी प्रदेश कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीरनाम्याचे प्रकाशन केले.

जाहीरनाम्यात काय?

  • मदरशांचे सर्वेक्षण, वक्फ मंडळाच्या मालमत्तांचा आढावा घेण्यासाठी टास्क-फोर्स.
  • देशविरोधी शक्तींचा धोका ओळखण्यासाठी कट्टरताविरोधी कक्षाची स्थापना.
  • धर्मातरसक्तीच्या गुन्ह्यासाठी आर्थिक दंडासह सश्रम कारावासाच्या शिक्षेची तरतूद.
  • नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार (सीएए) निर्वासितांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री शरणार्थी योजना.
  • मुलींना बालवाडी ते पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत.
  • एम्सच्या धर्तीवर दोन संस्थांची स्थापना आणि २० हजार सरकारी शाळांचा कायापालट.
  • १०० अन्नपूर्णा कॅण्टीन सुरू करून पाच रुपयांत तीन वेळचे जेवण.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या